मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा त्याच्या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आलाय. मिशन मजनू या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत साऊथची फेमस स्टार रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या मिशन मजनू (Mission Majnu) चित्रपटाला पाकिस्तानमध्ये ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर सतत या चित्रपटाची खिल्ली उडवताना पाकिस्तानमधील युजर्स दिसत आहेत. यासोबत त्यांनी बाॅलिवूडला देखील टार्गेट करण्यास आता सुरूवात केलीये. अनेकांचे म्हणणे आहे, चित्रपटामध्ये चुकीची उर्दू भाषा वापरण्यात आलीये. एकंदरीतच काय तर पाकिस्तामधील लोक मिशन मजनू या चित्रपटामधील सतत चुका काढत आहेत.
मिशन मजनू या चित्रपटामध्ये बाॅलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा एका रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. पाकिस्तानमध्ये एका खास मोहिमेसाठी सिद्धार्थ मल्होत्रा हा गेला असून तिथे काय काय घडले हे सर्व चित्रपटामध्ये दाखवण्यात आलंय.
Framing this and putting it by my front door so that ppl know where to put their شوس https://t.co/5rpFaMgHIh
— ChaiLatté⛄️❄️ (@thenorthaspoken) January 21, 2023
या चित्रपटामध्ये तो पाकिस्तानमध्ये लग्न देखील करतो. रश्मिका मंदाना ही चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. या दरम्यान चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा याचा एक वेगळा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
पाकिस्तानमध्ये सतत मिशन मजनू या चित्रपटाला ट्रोल केले जात आहे. चित्रपटामधील अगदी छोट्या छोट्या चुका काढल्या जात आहेत. मिशन मजनू या चित्रपटामध्ये उर्दू भाषा अनेक ठिकाणी चुकीची लिहिण्यात आलीये, असे युजर्स सोशल मीडियावर म्हणत आहेत.
They forgot adding “janaab” here… https://t.co/NN6gVB5stj
— Hassan Liaquat (@HassanLiaquat2) January 21, 2023
काही दिवसांपूर्वीच एका पाकिस्तानी पिझ्झा ब्रँडने देखील थेट बॉलिवूडलाच ट्रोल केले होते. मिशन मजनू या चित्रपटाला पाकिस्तानमध्ये विरोधात होताना दिसत आहे. मात्र, भारतामध्ये या चित्रपटाबद्दल क्रेझ दिसत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा हा त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे सहा फेब्रुवारीला लग्नबंधणात अडकणार असल्याचे सांगितले जातंय. राजस्थानमध्ये अत्यंत राॅयल पध्दतीने यांच्या लग्नसोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येतंय.
me an indian greeting the locals on my first day in pakistan pic.twitter.com/xP7ETItcUX
— ek pun ka jeena (@maulanaglumi) January 11, 2023
सिद्धार्थ मल्होत्रा याला लग्नाविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला होता की, मी देखील सर्वकाही वाचत आहे आणि पाहात आहे. परंतू मलाच अजून कोणीही लग्नाला बोलावले नाहीये.
मला असे वाटते की, लोकांनी माझ्या पर्सनल लाईफपेक्षा माझ्या चित्रपटांवर अधिक लक्ष केंद्रित करावे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची वाट पाहात आहेत.