मुंबई : ‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो (Freida Pinto) हिने चाहत्यांना चांगली बातमी दिली आहे. लवकरच ती आई बनणार आहे. अभिनेत्री फ्रिडा पिंटोने मंगळवारी जोडीदार कॉरी ट्रॅन (Cory Tran) याच्यासह एक फोटो शेअर करुन तिच्या गरोदरपणाची बातमी दिली आहे. या दरम्यान फ्रिडाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. काळ्या फुलांच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना फ्रिडाने लिहिले, ‘बेबी ट्रॉन येत आहे’. पहिल्या फोटोमध्ये जिथे हे दोघेही कॅमेराकडे पहात आहेत आणि पोझ देत आहेत, दुसऱ्या फोटोमध्ये कॉरी आणि फ्रिडा एकमेकांच्या नजरेत हरवले आहेत (Slumdog Millionaire actress Freida Pinto announces pregnancy with fiance Cory Tran).
फ्रिडाच्या या पोस्टवर चाहत्यांव्यतिरिक्त अनेक सेलेब्सनीही खूप प्रेमाचा वर्षाव केला आहे. प्रत्येकजण दोघांचे अभिनंदन करत आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने करत म्हटले की, “अरे व्वा! फ्रिडा आणि कॉरी तुमच्या दोघांचे खूप अभिनंदन.’ या नंतर मृणालने आणखी एक टिप्पणी केली, ‘मी किंचाळत आणि नाचत आहे.’ तर, नरगिस फाखरी हिने टिप्पणी केली, ‘वा! दोघांचे खूप अभिनंदन’.
2008 मध्ये ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या ब्रिटिश ड्रामा फिल्ममधून सर्वांचे मन जिंकणाऱ्या फ्रिडाने 2019 मध्ये कॉरीशी साखरपुडा केला होता. एंगेजमेंटची बातमी सांगताना फ्रिडाने लिहिले होते की, ‘आयुष्य आता समजले आहे, जग आता समजत आहे, जुन्या प्रेमी प्रेमाबद्दल जे काही म्हणायचे ते जाणवत आहेत. तू माझं प्रेम आहेस जो माझ्या आयुष्यात आला आहेस आणि तू आता इथेच राहशील, कारण मी तुला थांबवून ठेवेन…’ फ्रिडाचा जोडीदार, कॉरी ट्रॅन हा एक छायाचित्रकार आहे. ती अनेकदा कॉरीसह आपले फोटो शेअर करत असते.
फ्रिडाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, तिने आपल्या आईमुळे मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. तिने यातच आपले करिअर करावे, अशी तिच्या आईची इच्छा होती. त्यानंतर 2007मध्ये, एका एजन्सीने फ्रिडाला ‘स्लमडॉग मिलेनिअर’साठी ऑडिशन द्यायला सांगितले होते, ज्यामध्ये तिची निवड झाली. या चित्रपटात फ्रिडाबरोबर अभिनेता देव पटेल मुख्य भूमिकेत दिसला होता.
(Slumdog Millionaire actress Freida Pinto announces pregnancy with fiance Cory Tran)