मुंबई : सध्याच्या काळात शाहरुख खान (Shah Rukh Khan) अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे. ज्या मुलाच्या भविष्यासाठी आणि कारकिर्दीसाठी त्याने सुंदर स्वप्ने पाहिली होती, आज तोच मुलगा ड्रगच्या प्रकरणात अटकेत आहे. आर्यन खानला क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, शाहरुख खानच्या जुन्या मुलाखतीची चर्चा होत आहे, ज्यात त्याने मुलगा आर्यनचा जन्म आणि त्याच्या नावामागील कारण सांगितले.
सिमी गारेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने मुलगा आर्यनच्या जन्माची आणि गौरी खानच्या प्रसूतीची कथा उघड सांगितली होती. त्याला आर्यन हे नाव कसे सुचले आणि कुटुंबातील सदस्यांना आर्यन नाव कसे ठरवले गेले, याबद्दल सांगितले. नामकरण झाल्यानंतर सगळ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. शाहरुख खानने सांगितले होते की, एकदा तो त्याच्या स्टुडिओमध्ये बसला होता आणि त्याचवेळी आर्यन हे नाव त्याच्या मनात कसे आले, हे त्याला कळले नाही. आर्यन खानचा जन्म 1997 मध्ये झाला.
त्याचवेळी, 30 सप्टेंबर 1998 रोजी ‘रेडिफ’ ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने आर्यनच्या नावाची गोष्टही सांगितली. त्याने आपल्या मुलाचे नाव आर्यन ठेवण्याचा विचार केला का, असे विचारल्यावर शाहरुख खान म्हणाला होता, ‘मी फक्त आर्यन हे नाव ठेवले आहे. मला काय वाटले ते मला माहित नाही. मला फक्त या नावाचा उच्चार आवडला. मला वाटले की, जेव्हा तो मुलींना सांगेल की माझे नाव आर्यन आहे… आर्यन खान, तेव्हा मुली प्रभावित होतील. वास्तविक गौरी आणि माझ्यामध्ये समान वैशिष्ट्ये आहेत. आमच्या दोघांचे मोठे डोळे आणि मोठे ओठ आहेत. माहित नाही, पण तो आम्हा दोघांचे मिश्रण आहे.’
आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनला किल्ला न्यायालयाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. आर्यनचे वकील सतीश मानशिंदे हा खटला लढत आहेत आणि त्याच्यासाठी जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्यन खानच्या जामिनावर आता 13 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
क्रूझ ड्रग्स प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याचा अर्थ आर्यन खानला तुरुंगात रहावे लागणार आहे. आर्यनसह 5 जणांना कारागृहाच्या पहिल्या मजल्यावर बॅरेक क्रमांक 1 मध्ये ठेवण्यात येणार आहे. सर्व आरोपींना इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात येणार असून, कारागृहाचा गणवेश परिधान करावा लागणार आहे. आरोपींना बाहेरचे अन्न घेता येणार नाही. तसेच सर्वांना 5 दिवस विलगीकरणात ठेवणार असून, काही लक्षणे असल्यास कोरोना चाचणी केली जाईल. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.