सोलापूर : नुकतेच रणवीर सिंहने (Ranveer Singh) न्यूड फोटोशूट केल्याने मोठा गोंधळ उडालायं. रणवीरचे न्यूड फोटो सध्या चर्चेचा विषय बनले असून सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी रणवीरला या फोटोंवरून थेट टार्गेट केले आहे. काही अभिनेत्री देखील रणवीरच्या या फोटोशूटच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत. तसेच काहींनी या फोटोंवर रणवीरचे समर्थन देखील केल्याचे चित्र आहे. या फोटोशूटमध्ये (Photoshoot) रणवीर पूर्णपणे नग्न दिसतोयं. यामुळे हे काहींच्या नक्कीच पचणी पडलेले दिसत नाहीयं.
आता रणवीरच्या फोटोशूट वादामध्ये चक्क अबू आझमी यांनीही उडी घेतलीयं. सोलापूरमध्ये बोलताना अबू आझमी म्हणाले की, रणवीर सिंहने काय करावे हा त्याचा प्रश्न आहे. त्याने नंगानाच केला तरी आम्हाला काही अडचण नाही. मात्र, जे लोक हिजाब घालतात त्यांना या देशात विरोध कसा होऊ शकतो? हिजाब परिधान करणाऱ्यांना ठिकठिकाणी अडवलं जात आहे. त्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही. जर तुम्हाला अडचण असेल सुरक्षितेबाबत काळजी वाटत असेल तर वैयक्तिक त्यांची तपासणी करून चौकशी करा. मात्र हिजाबवर बंदी तुम्ही आणू शकत नाही
सार्वजनिक स्थळावरती तुम्ही नग्न फिरू शकत नाही, हे कायद्याने चुकीचे आहे. इतकेच नाही तर पुढे बोलताना अबू आझमी म्हणाले की, रणवीर सिंहवर गुन्हा दाखल करण्याइतका मी मोठा नाही. मी अतिशय छोटासा व्यक्ती आहे, माझं कोण ऐकणार? मी जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न ठेवला आहे जनतेने काय स्वीकारायचे ते ठरवावे. एकंदरीतच काय तर रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर देशात एकच गोंधळ निर्माण झालायं. सोशल मीडियावर तर हे फोटो व्हायरल झाल्यापासून अनेक प्रकारचे मीम्स प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. रणवीरच्या या लेटेस्ट स्टाइलने अनेकजण आर्श्चयचकित झालेत.