सोनाक्षी सिन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी अवघ्या 3000रुपयांवर नोकरी करायची; शिक्षण जाणूनही वाटेल आश्चर्य

| Updated on: Dec 25, 2024 | 7:36 PM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची अभिनय ही पहिली निवड कधीच नव्हती. बॉलिवूडमध्ये येण्याआधी ती एका ठिकाणी नोकरी करायची ज्याचे तिला फक्त 3000 रुपये मिळायचे. तिचे शिक्षण वाचूनही आश्चर्य वाटेल.

सोनाक्षी सिन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी अवघ्या 3000रुपयांवर नोकरी करायची; शिक्षण जाणूनही वाटेल आश्चर्य
Follow us on

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच चर्चेत असते. तिच्या चित्रपट तसेच अभिनयापेक्षाही तिच्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त चर्चा होताना दिसते. नुकतचं तिने झहीर इक्बालसोबत लग्न केलं त्यानंतरही बरीच चर्चा झाली. काही जणांनी तिला शुभेच्छा दिल्या तर काही जणांनी तिला ट्रोलही केलं.

अभिनय ही सोनाक्षीची पहिली आवड कधीच नव्हती 

सोनाक्षी सिन्हाच्या चित्रपटांबद्दल आपल्याला माहित आहे पण ती अभिनय क्षेत्रात येण्याआधी तिच्या आयुष्यात काय करत होती किंवा तिचं शिक्षण काय आहे? याबद्दल फार माहित नाही. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटले की सोनाक्षीची पहिली आवड ही अॅक्टींग नाही तर दुसरं क्षेत्र होतं.शिवाय ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी एका ठिकाणी कामही करत होती. ज्याचे तिला 3000 मानधन मिळत असे

सोनाक्षीचा पहिला चित्रपट सलमान खानसोबत होता. 2010 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा म्हणजे दबंग. दबंगमुळे सोनाक्षीचा चेहरा बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला आणि नंतरही तिला अनेक चित्रपट ऑफर झाले. तसेच ते काहीप्रमाणात तिचे चित्रपट हीटही ठरले. मात्र दबंग आधी तिने कधीच अभिनय क्षेत्रात येऊ असा तिने विचारही केला नव्हता. तिने वेगळ्याच एका क्षेत्रात काम केले होते.


सोनाक्षी सिन्हाचे शिक्षण किती आहे?

सोनाक्षी सिन्हाने आर्य विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेतले आहे. शाळेनंतर, तिने SNDT महिला विद्यापीठाच्या प्रेमलिला विठ्ठलदास पॉलिटेक्निकमधून फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी प्राप्त केली. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेरा दिल लेके देखो’ या चित्रपटाचे पोशाखही तिने डिझाइन केले होते. सोनाक्षीला फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचे होते.

अभिनय करण्यापूर्वी सोनाक्षी काय काम करत होती?

फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी सोनाक्षी सिन्हा फॅशन डिझायनिंगमध्ये काम करायची. एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले होते की, सर्वात आधी तिने एका फॅशन शोमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले, ज्यासाठी तिला 3000 हजार रुपये मिळाले. या शोदरम्यान ती सलमान खानलाही भेटली होती. फिल्म इंडस्ट्री ही सोनाक्षीची पहिली निवड कधीच नव्हती असंही तिने म्हटले आहे.

सोनाक्षीची एकूण संपत्ती

सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये 14 वर्षे झाली आहेत. तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. रिपोर्टनुसार सोनाक्षीची एकूण संपत्ती 100 कोटी रुपये आहे. यामध्ये चित्रपटाचे मानधन, ब्रँड जाहिराती आणि गुंतवणूक यांचा समावेश आहे. 2024 मध्ये रिलीज झालेल्या हीरामंडी मालिकेतही सोनाक्षी दिसली होती. आणि तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुकही झाले. दरम्यान, एका रिपोर्टच्या अहवालानुसार, झहीर इक्बालची एकूण संपत्ती 1-2 कोटी रुपये आहे.