Sonam Kapoor Troll | फोटो व्हायरल होताच सोनम कपूर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, कमेंट करत सुनावले

| Updated on: Jan 15, 2023 | 5:44 PM

सोनम जरी आज चित्रपटांपासून दूर असली तरीही ती कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वीच सोनम हिने मुलाला जन्म दिला आहे.

Sonam Kapoor Troll | फोटो व्हायरल होताच सोनम कपूर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, कमेंट करत सुनावले
Follow us on

मुंबई : अनिल कपूरच्या लेकीने काल मुंबईमधील वाहतूककोंडीचा प्रश्न मांडत एक ट्विट शेअर केले होते. या ट्विटनंतर सोनम कपूर (Sonam Kapoor) चर्चेमध्ये आली होती. या ट्विटमध्ये तिने मुंबईमधील रस्ते आणि प्रदूषण यावर भाष्य करत मुंबईमध्ये नेमकं चाललंय काय? हा प्रश्न देखील उपस्थित केला होता. मुंबईमध्ये गाडी चालवणे अवघड झाल्याचे देखील सोनम कपूर हिेने म्हटले होते. गेल्या काही वर्षांपासून सोनम कपूर ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. २०१९ मध्ये शेवटचा सोनम कपूर हिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सोनम जरी आज चित्रपटांपासून दूर असली तरीही ती कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वीच सोनम हिने मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव वायु असे ठेवले आहे.

काल सोनम कपूर हिने मुंबईच्या वाहतूककोंडीच्या विषयावर ट्विट केले होते. यामध्ये सोनम म्हणाली होती की, बँडस्टँडवरून जुहूला पोहोचायला मला एक तास लागला… जागोजागी बांधकाम सुरू असून मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत आणि प्रदुषणही खूप असून मुंबईमध्ये गाडी चालवणे अवघड आहे.

आता सोनम कपूर हिचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून या फोटोमुळे सोनम कपूर हिला जबरदस्त ट्रोल केले जात आहे. हा फोटो योगा क्लासला जात असतानाच असल्याचे सांगितले जात आहे.

या फोटोमध्ये एक व्यक्ती चक्क सोनम कपूर हिला चप्पल घालून देताना दिसत आहे. यामुळेच युजर्स या फोटोवरून सोनम कपूर हिला ट्रोल करत आहेत. एकाने कमेंट करत म्हटले की, सोनम कपूर स्वत: अशी वागते मग ही मुलगा वायु याला काय शिकवणार.

दुसऱ्याने लिहिले की, श्रीमंत असणे ठिक आहे पण…तुम्ही स्वत: तुमची चप्पल देखील घालू शकत नाहीत का? दुसऱ्याने लिहिले की, भाई चप्पल घालण्यासाठी देखील माणुस ठेवला आहे…अजून एकाने लिहिले, चप्पल घालू शकत नाहीतर मग योगा क्लासला जाऊन काय करणार ही?

सोनम कपूर हिचा हाच फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून लोक सोनमला खूप जास्त ट्रोल करत आहेत. सोनम कपूरच्या बाॅलिवूड पुनरागमनाची वाट चाहते गेल्या काही दिवसांपासून पाहात आहेत.