अभिनेत्री सोनम कपूरचे (Sonam Kapoor) सासरे हरीश अहुजा (Harish Ahuja) यांना 27 कोटी रुपयांचा चुना लागला आहे. फरिदाबाद पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या (cyber fraud) टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने हरीश अहुजा यांच्या शाही एक्स्पोर्ट फॅक्टरी या आयात-निर्याती करणाऱ्या कंपनीची फसवणूक केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. तेव्हापासून फरिदाबाद पोलिसांची एक टीम या प्रकरणावर काम करत होती. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कर्नाटकसह देशातील विविध ठिकाणांहून त्यांनी एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींमध्ये माजी लिपिक आणि परदेशी व्यापार महासंचालनालयाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. हे आरोपी डीजीएफटीच्या कामकाजात पारंगत होते. मनोज राणा, मनीष कुमार, प्रवीण कुमार, ललित कुमार जैन, मनीष कुमार मोगा, भुसन किशन ठाकूर, सुरेश कुमार जैन, गणेश परशुराम, राहुल रघुनाथ आणि संतोष सीताराम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
कशी केली फसवणूक?
सरकार निर्यात कंपन्यांना आरओएससीटीएल (ROSCTL) परवान्यांच्या स्वरूपात काही इन्सेन्टिव्ह देते. यामुळे त्यांना उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कात काही सूट मिळू शकते. हे आरओएससीटीएल परवाने काही लाख रुपयांच्या डिजिटल कूपनसारखे असतात. फसवणूक करणाऱ्यांनी आहुजांच्या फर्मचे 27.61 कोटी रुपये किमतीचे एकूण 154 आरओएससीटीएल मिळवले होते. हे कूपन्स ते त्यांच्याद्वारे उघडलेल्या बनावट कंपन्यांमध्ये हस्तांतरित करत होते, अशी माहिती फरिदाबादचे पोलीस उपायुक्त नितीश अग्रवाल यांनी दिली.
सोनमने 2018 मध्ये हरीश यांचा मुलगा आनंद आहुजाशी लग्न केलं. लग्नापूर्वी हे दोघं काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. भाने नावाचा फॅशन ब्रँड चालवण्याव्यतिरिक्त, आनंद त्याच्या वडिलांच्या कंपनीत संचालकदेखील आहे.
हेही वाचा:
वर्षभरही टिकलं नाही नातं; शमिता शेट्टी-राकेश बापटचं ब्रेकअप?
आधी ‘झुंड’वर ‘पावनखिंड’ भारी, आता ‘द काश्मीर फाईल्सनं’ दाबलं, IMDb रेटिंग्ज पाहिलात का?