विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलंच यश मिळालं. काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडणाऱ्या या चित्रपटावर विविध स्तरांतून प्रतिक्रियाही उमटल्या. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं, तर काहींनी त्याविरोधात आपलं मत मांडलं. आता प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) या चित्रपटाविषयी व्यक्त झाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनूने विविध विषयांवर त्याच्या प्रतिक्रिया दिल्या. सोनू निगम त्याच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याला त्याच्या या वक्तव्यांमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने 250 कोटींचा गल्ला जमवला आहे. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर (Anupam Kher) आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासह इतरही नामांकित कलाकारांच्या भूमिका आहेत.
‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू निगमने सांगितलं की त्याने अद्याप ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहिला नाही. हा चित्रपट न पाहण्यामागचं कारणसुद्धा त्याने पुढे सांगितलं. “त्या दु:खद, हृदयद्रावक कथा जेव्हा मी ऐकतो, तेव्हा माझं मन खूप दुखावतं. फक्त काश्मीरच्याच बाबतीत नाही, तर मी इतरही अनेक गुन्ह्यांबाबत आणि नकारात्मक घटनांबाबत संवेदनशील आहे. त्या चित्रपटाला पाहण्याइतकी हिंमत अजून तरी माझ्यात नाही”, असं तो म्हणाला.
As #TheKashmirFiles steps into ₹ 250 cr Club, it is now the 13th ALL-TIME HIGHEST GROSSING FILM of #Hindi cinema… #Flashback: Unseen pics of the producers joining hands to make the film, way back in 2019. #AbhishekAgarwal #VivekRanjanAgnihotri #PallaviJoshi #TejNarayanAgarwal pic.twitter.com/RxIUPP4NnV
— taran adarsh (@taran_adarsh) April 11, 2022
यावेळी तो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संसदेत ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाविषयी केलेल्या वक्तव्यावरही व्यक्त झाला. केजरीवाल यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे त्या सर्व काश्मिरी पंडितांचा अपमान आहे, ज्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना गमावलं, असं तो म्हणाला.
हेही वाचा:
रुपाली चाकणकर यांच्या मुलाचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका