Sonu Sood | कोट्यवधींच्या अफरातफरीचा आरोप, आता सोनू सूद म्हणतोय ‘कर भला, तो भला, अंत भले का भला’!

| Updated on: Sep 20, 2021 | 11:07 AM

गेल्या वर्षी त्यांनी कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या कारणास्तव स्थलांतरित कामगारांना मदत करून चर्चेत आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या आठवड्यापासून इतर कारणांमुळे चर्चेत आहे. आयकर विभागाने (Income Tax) सोनू सूदवर कर बुडवल्याचा आरोप आहे.

Sonu Sood | कोट्यवधींच्या अफरातफरीचा आरोप, आता सोनू सूद म्हणतोय ‘कर भला, तो भला, अंत भले का भला’!
सोनू सूद
Follow us on

मुंबई : गेल्या वर्षी त्यांनी कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या कारणास्तव स्थलांतरित कामगारांना मदत करून चर्चेत आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या आठवड्यापासून इतर कारणांमुळे चर्चेत आहे. आयकर विभागाने (Income Tax) सोनू सूदवर कर बुडवल्याचा आरोप आहे. सोनूच्या सहा ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर आयटी विभागाला सोनू सूदने 20 कोटी रुपयांचा कर बुडवल्याचे पुरावे मिळाले आहेत. इतक्या सगळ्या प्रकारानंतर चुप्पी साधलेल्या सोनू सूदने आता सोशल मीडियावर या विषयावर एक पोस्ट शेअर केली आहे.

एक लांबलचक पोस्ट शेअर करताना सोनू सूदने लिहिले की, ‘कठीण रस्त्यांवरही प्रवास करणे सोपे वाटतेत, प्रत्येक भारतीयांच्या प्रार्थनेचा परिणाम होतोय असे वाटते.’ या प्रदीर्घ पोस्टमध्ये सोनूने लिहिले की, ‘तुम्हाला स्वतःला नेहमीच तुमची बाजू मांडण्याची गरज नाही काही गोष्टी वेळ सांगतो. मी भाग्यवान आहे की, मी माझ्या संपूर्ण ताकदीने आणि मनाने भारतीय लोकांची सेवा करू शकलो. माझ्या फाउंडेशनमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक रुपया मौल्यवान जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंसाठी आहे. यासह, अनेक प्रसंगी, मी जाहिरात ब्रँडना माझे शुल्क दान करण्यास प्रोत्साहित केले आहे जेणेकरून कोणालाही पैशांची कमतरता भासू नये.’

पाहा पोस्ट :

सोनूने पुढे लिहिले की, ‘मी काही पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त होतो आणि म्हणून गेल्या 4 दिवसांपासून तुमची सेवा करण्यासाठी उपलब्ध नव्हतो. आता मी पुन्हा एकदा आयुष्यभर तुमच्या सेवेत संपूर्ण नम्रतेने परत आलो आहे. चांगले करा, चांगलेच होईल, शेवटही चांगला होईल. माझा प्रवास चालू राहील. जय हिंद.’

कर बुडवल्याचा आरोप

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शनिवारी आरोप केला की, सोनू सूद आणि त्याच्या साथीदारांनी 20 कोटी रुपयांची करचुकवेगिरी केली आहे. बोर्डाने असेही आरोप केले की, जेव्हा आयकर विभागाने त्याच्या आणि त्याच्याशी संबंधित लखनौ स्थित गटाच्या जागेवर छापा टाकला तेव्हा, असे आढळून आले की त्याने अनेक बनावट संस्थांकडून बनावट असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात आपले बेहिशेबी उत्पन्न दाखवले आहे. परदेशातून निधी गोळा करताना सूदने परदेशी परकीय चलन कायद्याचेही (एफसीआरए) उल्लंघन केल्याचा आरोपही विभागाने केला आहे.

सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा?

प्राप्तिकर विभागाने सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा याची मोडस ऑपरेंडी स्पष्ट केली आहे. सोनू सूद हा बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज घेतल्याचे दाखवून बेहिशेबी पैसे आपल्या बँक खात्यात वळते करायचा. आयकर विभागाने सोनू सूदच्या घरी आणि संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये यासंबंधीची कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदने तब्बल 20 कोटी रुपयांची कर बुडवेगिरी केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

परकीय चलन कायद्याचेही उल्लंघन

सोनू सूदने परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडीदरम्यान काही कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदला मोठ्याप्रमाणावर परकीय चलनाच्या स्वरुपात देणगी मिळाली होती. हे पैसे त्याने खर्च केल्याचा संशय प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.

हेही वाचा :

IT Survey On Sonu Sood : सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचा सर्व्हे सुरूच, सोनू सूदच्या बेहिशेबी मालमत्तेची होतेय चौकशी

Samantha New Film : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान समंथाने स्वीकारला नवा चित्रपट, ब्रेक घेण्याचा निर्णय केला रद्द?