मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे प्रदर्शन अनेक वेळा पुढे ढकलण्यात आले आहे. आता, 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सिनेमागृहे उघडणार असल्याच्या बातम्या आल्यापासून मनोरंजन क्षेत्रात आनंदाची लाट उसळली आहे. निर्माते त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत आहेत. दिवाळीनिमित्त अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांना खास भेट देणार आहे.
अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि दिवाळीच्या निमित्ताने ‘पोलीस’ येत असल्याची माहिती दिली, पण त्याने तारीख जाहीर केली नाही. आता चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की सूर्यवंशी दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित होईल की, दुसऱ्या दिवशी प्रदर्शित होईल…
बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, ही तारीख अद्याप अधिकृतपणे निश्चित केलेली नाही.
व्यापार तज्ज्ञांच्या मते, पूर्वी नियम असा होता की, जर चित्रपट दिवाळीला रिलीज होईल असे सांगितले जात असेल तर तो दिवाळीच्या दिवशी रिलीज व्हायचा, पण बॉक्स ऑफिस कलेक्शनवर त्या दिवशी परिणाम दिसायचा. कारण लोक त्यादिवशी पूजा आणि इतर उपक्रम व्यस्त असतात.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी असते, ज्यामुळे चित्रपट कलेक्शन रेकॉर्ड बनवतो. गेल्या काही वर्षांत, हॅपी न्यू इयर, प्रेम रत्न धन पायो आणि गोलमाल अगेन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रिलीज झाले आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.
सूर्यवंशीच्या निर्मात्यांचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक वेळा पुढे ढकलण्यात आल्यानंतरही चित्रपटाविषयीची उत्सुकता कायम आहे. कोरोना महामारीनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करण्यात यशस्वी ठरले आहेत.
आम्ही तुम्हाला सांगू की, सूर्यवंशी आधी 24 मार्च 2020ला रिलीज होणार होता. पण कोरोना महामारीमुळे तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर, हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज करण्याची तयारी करण्यात आली होती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागले.
‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच रणवीर सिंग आणि अजय देवगण पाहुण्यांच्या भूमिकेत दिसतील.
Tuljapur | महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची छबिना मिरवणूक #Tuljapur #Tuljabhavani #Navratri pic.twitter.com/O2319pGJrE
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2021