जे लोक अगोदर शिव्या देत होते तेच आता माफी मागत आहेत, The Kerala Story चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केला मोठा खुलासा

| Updated on: May 11, 2023 | 7:09 PM

द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. मात्र, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळत आहे.

जे लोक अगोदर शिव्या देत होते तेच आता माफी मागत आहेत, The Kerala Story चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केला मोठा खुलासा
Follow us on

मुंबई : द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. चित्रपटाचे टिझर रिलीज झाल्यापासूनच मोठा वाद हा सातत्याने बघायला मिळतोय. द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ही सुरूवातीपासूनच केली जात आहे. मात्र, मोठ्या वादानंतर 5 मे रोजी चित्रपट रिलीज झाला. मात्र, आता चित्रपट (Movie) रिलीज होऊन सहा दिवस उलटले असताना देखील चित्रपटाचा वाद हा काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. काही राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी आहे तर काही राज्यांमध्ये चित्रपट हा टॅक्स फ्री करण्यात आलाय. दुसरीकडे प्रेक्षकांचे जबरदस्त प्रेम द केरळ स्टोरी चित्रपटाला मिळताना दिसत आहे. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाका करत आहे.

चित्रपट 150 कोटींचे कलेक्शन करेल याचा अगोदरपासूनच होता विश्वास 

नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी एका मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांला हात घातला आहे. सुदीप्तो सेन यांनी थेट म्हटले की, अगोदर जे लोक चित्रपटासाठी आम्हाला शिव्या द्यालत होते तेच लोक आता काैतुक करताना दिसत आहेत. चित्रपट 150 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करेल याचा विश्वास असल्याचे देखील सुदीप्तो सेन यांनी म्हटले.

केरळमधील महिलांचा आवाज दाबला गेला होता 

सुदीप्तो सेन म्हणाले की, आनंद याच गोष्टींचा आहे की, केरळमध्ये जे महिलांसोबत घडले तो आता एक राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. मी या विषयावर तब्बल सात वर्ष काम केले. मुळात म्हणजे लोक चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी का करत आहे हेच मला कळत नाहीये. केरळमधील महिलांचा आवाज कुठेतरी दाबला केला होता आणि या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना एक आवाज मिळालाय.

लोकांचा प्रचंड असा सपोर्ट मिळतोय 

सोशल मीडियावर द केरळ स्टोरी चित्रपटाला लोकांचा ज्याप्रकारे सपोर्ट मिळत आहे त्यावरही सुदीप्तो सेन यांनी भाष्य केले आहे. सुदीप्तो सेन म्हणाले की, जे लोक अगोदर चित्रपटाच्या विरोधात पोस्ट शेअर करत होते, ते आता पर्सनली साॅरीचे मेसेज करत आहेत. एक मुलगी आहे केरळची ती सतत चित्रपटाच्या विरोधात बोलत होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच तिने एक मेसेज करून इंस्टाग्रामवर माफी मागितली आहे.

बीजेपीचे चमचे सुरूवातीला म्हटले गेले, मात्र आता तेच लोक

इतकेच नाही तर त्या मुलीने तुम्ही खूप जास्त छान काम केल्याचे देखील म्हटले. सुरूवातीला लोक आम्हाला बीजेपीचे चमचे म्हणत होते. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्या लोकांचा चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. सेंसर बोर्डमध्ये दोन महिने द केरळ स्टोरी चित्रपट असल्याचे देखील सुदीप्तो सेन यांनी म्हटले आहे.

सेंसर बोर्डकडून करण्यात आले चित्रपटात हे मोठे बदल 

सुदीप्तो सेन म्हणाले, चित्रपटात जे डायलॉग्स होते ते आपल्या दररोजच्याच जीवनामधील होते. यामुळे फार काही बदल करण्याची वेळ आली नाही. हा पण सेंसर बोर्डने काही बदल सांगितले होते, जसे की शिव ऐवजी भगवान, इंडियन कम्यूनिस्ट ऐवजी फक्त कम्यूनिस्ट. मी स्वत: या चित्रपटाच्या स्टोरीचे रिसर्च केले होते. माझ्याकडे कागदपत्र देखील आहेत.

विषय हा हिंदू किंवा मुस्लीम यांचा अजिबातच नाहीये 

सुदीप्तो सेन यांनी चित्रपटाच्या वादावर देखील भाष्य केले आहे. सुदीप्तो सेन म्हणाले, मुळात म्हणजे विषय हा हिंदू किंवा मुस्लीम यांचा अजिबात नाहीये. विषय हा फक्त आणि फक्त केरळमधील त्या महिलांवर आहे. राजकारणामुळे विषय हा जातीयवादाकडे गेला आहे. आपल्या देशात जेंव्हा आपण आईएसआईएसबद्दल बोलतो त्यावेळी लोकांना वाटते की, हे धर्माबद्दल बोलले जात आहे.

निकाल हा आमच्याकडूनच लागेल याची आशा नक्कीच आहे 

चित्रपटावरील बंदीवर सुदीप्तो सेन म्हणाले, हा हे बरोबर आहे की, आम्ही कोर्टात धाव घेतलीये. कारण पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आलीये. शुक्रवारी यावर सुनावणी देखील होणार आहे. आम्हाला अशा आहे की, निकाल हा आमच्याकडूनच लागेल. तामिळनाडूमध्येही कोर्टाकडून परवानगी ही देण्यात आलीये.

आमच्यामुळे बाॅलिवूडला नुकसान व्हावे असे अजिबात नाही वाटत

चित्रपट रिलीज झाल्यापासून लोकांचे मला सतत फोन येत आहेत. लोक चित्रपटाचे काैतुक करत आहेत. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अत्यंत वाईट काळामधून जात आहे. त्यांचे चित्रपट चालत नाहीत. आम्हाला अजिबात वाटत नाही की, आमच्या चित्रपटामध्ये त्यांना काही समस्या निर्माण व्हाव्यात. पूर्ण लोक आमच्यासोबत आहेत.

हे सर्व फक्त आणि फक्त राजकारण सुरू

सुदीप्तो सेन यांनी मिळणाऱ्या धमक्यांवर देखील भाष्य केले आहे. सुदीप्तो सेन म्हणाले की, अरे काहीच चिंतेचा विषय नाहीये. हे सर्व राजकारण आहे फक्त. त्याचे खरे काही कलेक्शन नाहीये. मी सर्व राजकिय लोकांना विनंती करू इच्छतो की, सर्वांनी जाणून अगोदर द केरळ स्टोरी हा चित्रपट बघावा आणि नंतर यावर काही भाष्य करायला हवे.