मुंबई : आज सुनील शेट्टीच्या लेकीचा 30 वा वाढदिवस आहे. लेकीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता सुनील शेट्टीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अथिया शेट्टी सध्या भारतीय क्रिकेटर केएल राहुल याला डेट करत आहे. दोघांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर बघायला मिळतात. केएल राहुलच्या वाढदिवसाच्या दिवशी अथियाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
अथियाचे कुटुंब आणि चाहत्यांनी हा दिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अथियाच्या वाढदिवसानिमित्त तिचे वडील सुनील शेट्टी यांनी खास फोटो शेअर करत अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनील शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या जिंदगीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि काही इमोजी देखील शेअर केले.
अर्थिया शेट्टीने सुनील शेट्टीच्या पोस्टवर रिप्लाय करत Love You म्हणत हार्ट इमोजी शेअर केलाय. सुनील शेट्टी आणि अथिया शेट्टीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अथियाने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. तर सुनील शेट्टी हे निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत.