मुंबई : आज संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यानिमित्ताने सनी देओल (Sunny Deol) याच्या ‘गदर २’ या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. गदर २ चे पोस्टर रिलीज करत सनी देओल याने या खास दिवशी चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. विशेष बाब म्हणजे गदर १ प्रमाणेच तोच जोश सनी देओलमध्ये दिसत आहे. गदर २ (Ghadar 2) च्या तारा सिंह अर्थातच सनी देओल याच्या हातामध्ये आता थेट हातोडा दिसत आहे. गदर १ मध्ये हातपंप होता. गदर २ चे फर्स्ट लूक पोस्टर चाहत्यांना प्रचंड आवडले असून हे सोशल मीडियावर (Social media) तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टरवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहे.
तारा सिंह याच्या डोळ्यात पूर्वीप्रमाणेच राग दिसतोय. त्याच्या हातात हातोडा असून काळ्या कपड्यांसोबत त्याने हिरवी पगडी घातल्याचे दिसत आहे. हे पोस्टर पाहून चाहत्यांची आता गदर २ बद्दलची आतुरता वाढली आहे.
गदर चित्रपटाप्रमाणेच सनी देओल आणि आमिषा पेटल यांची केमिस्ट्री गदर २ मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. गदर १ ला चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिले होते. एक काळ गदर १ ने गाजवला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त गदर २ चे पोस्टर रिलीज करताना सनी देओल याने खास कॅप्शन देखील दिले असून सनी देओल याने लिहिले की, हिंदुस्तान जिंदाबाद है… जिंदाबाद था… और जिंदाबाद रहेगा…
Hindustan Zindabaad Hai….Zindabaad Tha.. .aur Zindabaad Rahega!
This Independence Day, we bring to you the biggest sequel in Indian cinema after two decades.#Gadar2 releasing on 11th August 2023?#HappyRepublicDay@ZeeStudios_ @ameesha_patel @iutkarsharma @Anilsharma_dir pic.twitter.com/Tz9dbysDRe— Sunny Deol (@iamsunnydeol) January 26, 2023
आता सनी देओल याच्या याच पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहे. गदर २ ची शूटिंग आता पूर्ण झालीये. ११ आॅगस्टला गदर २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपट धमाका करण्याची शक्यता आहे.
सनी देओल आणि अमिषा पटेल हे चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहेत. अनिल शर्माने चित्रपटाची निर्मिती केली असून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
गदर एक प्रेम कथा हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. चित्रपटाचे नाईट शो देखील सुरू असायचे. सर्वच शो हाऊसफुल देखील सुरू राहिचे.