मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुष्मिता सेन हिला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि हृदयात स्टेंटही बसवण्यात आले. सुष्मिता सेन हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social media) याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. यानंतर चाहते तिच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसले. सुष्मिता सेन आणि ललित मोदी गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ललित मोदींनी (Lalit Modi) काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेन हिच्यासोबतचे खास फोटो शेअर केले होते. सुष्मिता सेन हिच्या आरोग्याविषयी आता अजून एक मोठे अपडेट पुढे आले आहे.
सुष्मिता सेन ही नुकताच आपल्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर लाईव्ह आली होती. सुष्मिता सेन हिला पाहून चाहत्यांमधील चिंता अधिक वाढल्याचे दिसत आहे. चाहत्यांसोबत बोलताना सुष्मिता सेन ही भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाली. इतकेच नाहीतर सुष्मिता सेन हिला अजून एका आजारीची लागण झालीये.
सुष्मिता सेन ही लाईव्ह आल्यानंतर भावूक होत ढसाढसा रडताना देखील दिसलीये. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आता सुष्मिता सेन हिला फिवर झालाय, तिला व्यवस्थित बोलणे देखील कठिण झाले असून तिचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. यावेळी सुष्मिता सेन ही रडताना देखील दिसलीये.
सुष्मिता सेन हिने सर्वांचे आभार मानले आहेत. कारण सुष्मिता सेन हिला हृदयविकाराचा झटका आल्याचे कळल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंता बघायला मिळत होती. सुष्मिता सेन हिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. एका युजर्सने लिहिले की, मॅम आरोग्याकडे लक्ष द्या.
दुसऱ्याने लिहिले की, मॅम लवकर ठिक व्हा आणि बाॅलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करा. तिसऱ्याने लिहिले की, तुम्ही लवकर ठिक व्हा, तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सुष्मिता सेन हिचा व्हिडीओ पाहून चाहते काळजीत पडल्याचे दिसत आहेत. कारण अजूनही सुष्मिता सेन हिची तब्येत चांगली झाली नसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत नाहीये.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याने बहिणीसाठी काळजी व्यक्त केली होती. राजीव सेन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्यामध्येच त्याने सुष्मिता सेन हिच्या चांगल्या आरोग्यासाठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.