Swara Bhasker | स्वरा भास्कर हिला बाॅलिवूडमध्ये मिळत नाहीये काम, अखेर अभिनेत्री म्हणाली…

| Updated on: Dec 06, 2022 | 6:33 PM

इतकेच नव्हेतर याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Swara Bhasker | स्वरा भास्कर हिला बाॅलिवूडमध्ये मिळत नाहीये काम, अखेर अभिनेत्री म्हणाली...
Follow us on

मुंबई : राजकिय, सामाजिक असा कोणताही विषय असो अभिनेत्री स्वरा भास्कर आपले मत मांडल्याशिवाय राहत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी स्वरा भास्कर प्रचंड चर्चेत आली होती. राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये स्वरा भास्कर सहभागी झाली होती. इतकेच नव्हेतर याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये स्वरा राहुल गांधीला फुले देताना दिसत होती. काहींनी स्वराचे हे फोटो पाहून तिला ट्रोल केले तर काहींनी तिचे समर्थन देखील केले.

स्वरा भास्कर हिच्या बाॅलिवूड करिअरचा आलेख बघितला तर लक्षात येईल की, तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 7 हीट चित्रपट केले आहेत. स्वरा तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते.

स्वरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी काही पोस्ट टाकते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून स्वरा ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

नुकताच स्वरा हिने एक मुलाखत दिलीये. यामध्ये स्वराने मनातील खदखद व्यक्त करत म्हटले आहे की, मला जेवढ्या प्रमाणात काम मिळायला हवे, त्या तुलनेत मला काम मिळत नाहीये.

सध्या माझ्या हातामध्ये काहीच काम नसल्याचे देखील स्वराने म्हटले आहे. मी करिअरमध्ये सहा ते सात हीट चित्रपट दिले असूनही माझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, याचे कारण मला काही कळू शकले नाहीये.

पुढे स्वरा म्हणाली की, मी बेव सीरिजमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे कधीच माझ्या चित्रपटांना किंवा मला खराब रिव्यू मिळाले नाहीयेत. मला असे कधी वाटले नाही पाहिजे की, मला काम मिळत नाहीये. परंतू हे स्पष्ट दिसत आहे मला जास्त काम मिळत नाही.

स्वरा राजकिय विषयांमध्येही तिचे मुद्दे ठेवते. नादव लॅपिड याने द काश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे समर्थन स्वरा भास्कर हिने केल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.