Swara Bhaskar | विवेक अग्निहोत्री यांच्यावर भडकली स्वरा भास्कर, म्हणाली नीच आणि…

| Updated on: Feb 25, 2023 | 2:24 PM

द कश्मीर फाईल्स चित्रपटाचा विषय आल्यावर विवेक अग्निहोत्री हे कसे मागे राहू शकतात. प्रकाश राज यांच्यावर सडकून टिका विवेक अग्निहोत्री यांनी केली. विशेष म्हणजे अनुपम खेर यांनीही प्रकाश राज यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.

Swara Bhaskar | विवेक अग्निहोत्री यांच्यावर भडकली स्वरा भास्कर, म्हणाली नीच आणि...
Follow us on

मुंबई : डायरेक्टर विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे कायमच चर्चेत असतात. विषय कोणत्याही असो आपले मत मांडताना ते कोणाचाही विचार करत नाहीत. काही दिवसांपूर्वी प्रकाश राज यांना विवेक अग्निहोत्री यांनी खडेबोल सुनावले होते. प्रकाश राज यांनी केरळमधील मातृभूमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ लेटर्समध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपटाला बकवास म्हटले होते. प्रकाश राज यांनी द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटाला बकवास म्हटल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. द कश्मीर फाईल्स चित्रपटाचा विषय आल्यावर विवेक अग्निहोत्री हे कसे मागे राहू शकतात. प्रकाश राज यांच्यावर सडकून टिका विवेक अग्निहोत्री यांनी केली. विशेष म्हणजे अनुपम खेर यांनीही प्रकाश राज यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री स्वरा भास्कर देखील प्रचंड चर्चेत आहे. स्वरा भास्कर हिने काही दिवसांपूर्वीच लग्न केल्याचे जाहिर केले. स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले. 6 जानेवारीला तिने फहाद अहमद याच्यासोबत लग्नगाठ बांधली.

स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टिका केली. कारण फहाद अहमद याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने फहादला भाऊ म्हणून सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यामुळे स्वरा सर्वांच्या निशाण्यावर आली. अनेकांनी स्वरा भास्कर विरोधात सोशल मीडियावर पोस्टही शेअर केल्या.

सोशल मीडियावर सध्या स्वरा भास्कर आणि विवेक अग्निहोत्री यांच्यामध्ये वाद बघायला मिळत आहे. नुकताच विवेक अग्निहोत्री यांच्या विरोधात स्वरा भास्कर हिने एक पोस्ट शेअर केलीये. आता स्वराचे ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत असून तिने थेट विवेक अग्निहोत्री यांना विषारी आणि कट्टर म्हटले आहे.

पोस्ट शेअर करताना स्वरा भास्कर हिने लिहिले की, विवेक अग्निहोत्रीचे नाव घेणे, असभ्यतेचा वापर करणे, मुस्लिम नागरिकांवर ते मुस्लिम आहेत म्हणून सार्वजनिक व्यासपीठावर आरोप करतात, हे ‘न्यू इंडिया’मध्ये आपले सार्वजनिक भाषण किती नीच, विषारी, धर्मांध आहे याचे उत्तम उदाहरण आहे आणि ते बहुसंख्य झाले आहे.

शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट ठरल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी शाहरूख खान याचे काैतुक केले. एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या यशाचे कारण हा शाहरूख खान असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. अजूनही प्रेक्षकांमध्ये पठाण चित्रपटाबद्दल क्रेझ बघायला मिळत आहे.