मुंबई : थप्पड फेम तापसी पन्नू तिच्या (Taapsee Pannu) सुंदर अभिनयासाठी चाहत्यांमध्ये ओळखली जाते. तापसीनं तिच्या कारकिर्दीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. चाहत्यांसमोर विविध प्रकारचे चित्रपट घेऊन येणाऱ्या तापसी पन्नूचा नुकतंच 1 ऑगस्टला वाढदिवस पार पडला. तापसीला फक्त 34 वर्षांची आहे. सिनेसृष्टीत यशाची चव चाखलेली तापसी पन्नू कोट्यवधींच्या मालमत्तेची मालक आहे.
तापसी पन्नूनं तिच्या चित्रपटांद्वारे एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. तापसीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथच्या चित्रपटांपासून केली आणि त्यानंतर ती मुंबईत आली. तापसी पन्नूनं हळूहळू चाहत्यांमध्ये एक विशेष ओळख निर्माण केली आहे. तापसी स्वतः एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे. आज आम्ही तापसी पन्नूच्या मालमत्तेविषयी, लक्झरी कार कलेक्शन इत्यादी बद्दल सांगणार आहोत.
तापसीची नेट वर्थ
तापसी साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करायची, मात्र आता ती हिंदी चित्रपटसृष्टीचा एक चमकणारा चेहरा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तापसी पन्नूची नेटवर्थ सुमारे $ 6 दशलक्ष (सुमारे 44 कोटी रुपये) आहे.
एवढंच नाही तर अभिनेत्री दरमहा सुमारे 30 लाख रुपये कमावते.वार्षिक कमाई पाहता ती अंदाजे 4 कोटी आहे.
कमावण्याचे साधन
तापसीकडे कमाईचे वेगवेगळे साधन आहेत. ती चित्रपटांमधून भरपूर पैसा कमावते. याशिवाय ती ब्रँड प्रमोशनच्या मदतीने लाखो रुपये कमवते. रिपोर्ट्सनुसार, ती प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी सुमारे 2 कोटी रुपये घेते. अभिनेत्रींच्या मालमत्तेतही गुंतवणूक केली आहे.
तापसी पन्नूची कार
तापसीसोबत गाड्यांचंही चांगलं कलेक्शन आहे. तिच्याकडे मर्सिडीज एसयूव्ही आहे, ज्याची किंमत सुमारे 52 लाख रुपये आहे, याशिवाय तापसी पन्नूकडे बीएमडब्ल्यू 5 आणि रेनो कंपनीची कार देखील आहे.
तापसी पन्नूचं घर
तापसी पन्नू अनेकदा तिच्या घराची झलक सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत असते. मीडिया रिपोर्टनुसार, तापसीचे मुंबईतील अंधेरी भागात तीन फ्लॅट आहेत, त्यापैकी अभिनेत्री स्वतः 3 बीएचके फ्लॅटमध्ये राहते.
संबंधित बातम्या