मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील महत्वाची भूमिका साकारणारे सर्वांचे आवडते तारक मेहता अर्थात शैलेश लोढा सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच शैलेश लोढा यांनी मालिकेला कायमचा राम राम ठोकला. मात्र, तारक मेहता गेल्यापासून मालिकेतील मजाच गेलीये. कारण तारक मेहता आणि जेठालाल यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. निखळ मैत्रीचे उत्तम उदाहरण म्हणजे तारक मेहता आणि जेठालालची मैत्री होती. आपल्या मित्राला अडचणीमधून काढताना अनेकदा तारक मेहता अडचणीमध्ये यायचे.
रक मेहता अर्थात शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिर नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही तर परत एका शोमध्ये येण्याची विनंती सातत्याने प्रेक्षक शैलेश लोढा यांना करताना दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये तारक मेहता या मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडून गेले आहेत. यामध्ये महत्वाचे नाव म्हणजे दया बेन. दया बेनला परत आणण्यासाठी निर्माते प्रयत्न करत असतानाच शैलेश लोढा यांनीही मालिका सोडली आहे.
शैलेश लोढा यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी मालिका सोडली हे काही कळू शकले नाहीये. मात्र, मालिका सोडल्यापासून शैलेश लोढा चाहत्यांच्या संपर्कात असून सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत आहेत.
नुकताच शैलेश लोढा यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, शैलेश लोढा यांचा हा फोटो पाहून अनेक चर्चांना उधाण आले असून सोशल मीडियावर चाहते अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत.
शैलेश लोढा यांनी अभिनेता विकी काैशलसोबतचा एक पोस्ट शेअर केला आहे. इतकेच नव्हे तर या फोटोसोबत त्यांनी मोठी पोस्टही लिहिली आहे. हाच फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
शैलेश लोढा आणि विकी काैशलचा हा फोटो पाहून अनेकांनी असा अंदाजा लावला आहे की, लवकरच शैलेश लोढा हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. मात्र, यावर अजून शैलेश लोढा यांच्याकडून काही स्पष्टीकरण देण्यात आले नाहीये.
शैलेश लोढा यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत म्हटले आहे की, मेहता साहब….परत मालिकेमध्ये या…मेहता साहब तुमची कमी तारक मेहता मालिकेत आम्हाला जाणवत आहे.