मुंबई : मलायका अरोरा ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान यांनी अचानक घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. मात्र, अजूनही यांचा घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणाने झाला हे कळू शकले नाही. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करतंय. विशेष म्हणजे हे दोघे अनेकदा सुट्टयासोबत घालवताना देखील दिसतात. मलायका आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे एकमेकांसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात.
काही दिवसांपूर्वी एक चर्चा जोरदार रंगताना दिसत होती. मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर संताप व्यक्त करत अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. अर्जुन कपूर याने आपल्या या पोस्टमध्ये अनेकांनी खडेबोल देखील सुनावले होते.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र, अजूनही यांनी आपल्या लग्नावर काहीही भाष्य केले नाहीये. अनेक पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सोबतच हजेरी लावतात. मलायका तिच्या शोमुळेही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये करण जोहर या पोहचला होता. करण जोहर हा चक्क मलायका अरोरा हिला तिच्या सेक्स लाईफबद्दल विचारत होता.
सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ अॅवार्ड सोहळ्यातील असल्याचे सांगितले जातंय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ मोठया प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघे दिसत आहेत. यावेळी अर्जुन कपूर असे काही करतो हे पाहून सर्वांना धक्का बसलाय.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्या थोडी पुढे बसली आहे. यावेळी अर्जुन कपूर या मागून मलायका अरोरा हिच्या केसांना हात लावतो. मग मलायका मागे बघते आणि त्याला काहीतरी बोलते आणि पुढे बघते. तेवढ्यात अर्जुन कपूर हा मलायका अरोरा हिचे केस ओढतो, त्यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्यावर चिडताना दिसत आहे. आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओला ट्रोल करण्यासही सुरूवात केलीये.