मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने दाखवून दिले आहे की, उगाच आपल्याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जात नाही. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. याला फक्त अजय देवगणचा चित्रपट अपवाद ठरला. आमिर खान आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्यासारख्या मोठ्या स्टारचे देखील चित्रपट फ्लाॅप जात असताना शाहरुख खान याने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर धमाका करत त्याच्या पठाण चित्रपटाने जबरदस्त कमाई केलीये. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची गेल्या चार वर्षांपासून सतत वाट पाहत होते. मुळात म्हणजे शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरला.
पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख खान हा जबरदस्त अॅक्शन करताना दिसला. विशेष म्हणजे पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासह चाहत्यांना सलमान खान याची देखील झलक बघायला मिळाली. चित्रपटामध्ये पठाण ज्यावेळी अडचणीमध्ये सापडला, त्यावेळी सलमान खान त्याच्या मदतीला धावून आल्याचे दाखवण्यात आले.
एकीकडे पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कमाई करत असतानाच दुसरीकडे शाहरुख खान याने त्याच्या आगामी जवान चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात केलीये. नुकताच त्याने डंकी चित्रपटाची शुटिंग पूर्ण केलीये. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट यंदाचा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
A Muslim man sitting on a stage with an American anchor in America and explaining him the Ramayana and telling “Say Siyapati Ramchandra Ji Jai”
How can you hate this man, Really shocked that some Hindu people target him.#ShahRukhKhan? #Pathan #IndiaUnite pic.twitter.com/Z7X9pVwDJd
— Raghib Malik (@Oye_Raghib) February 6, 2023
हे सर्व सुरू असतानाच शाहरुख खान याचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी शाहरुख खान याचे काैतुक करण्यास सुरूवात केलीये. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा विदेशात एक मुलाखती देताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा प्रभू राम यांच्याबद्दल माहिती सांगताना दिसत आहे. शाहरुख खान ही सर्व माहिती होस्ट डेव्हिड लेटरमॅनला सांगत आहे. शाहरुख खान म्हणाला की, माझ्या लहानपणी मी कायमच रामलीलामध्ये भाग घेत होतो आणि मी वानर बनून प्रभू रामाचे नामस्मरण करत असे…
हे सर्व सांगताना शाहरुख खान याने सियापती रामचंद्र की…असे म्हणताच या मुलाखतीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी जय म्हणत जयघोष केला. आता हाच शाहरुख खान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत शाहरुख खान याचे काैतुक करण्यास सुरूवात केली आहे.