मुंबई : 2021 मध्ये बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याचे नाव पोर्नोग्राफी प्रकरणात आले होते. याच प्रकरणात राज याला तब्बल 2 महिने जेलमध्ये मुक्काम करावा लागला. या प्रकरणातील राज कुंद्राच्या समस्या अजूनही कमी झाल्या नाहीयेत. परंतू नुकताच सर्वोच्च न्यायालयाने राज कुंद्रासह तीन जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आता राज कुंद्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पोर्नोग्राफी प्रकरणात जेलमधून बाहेर आल्यानंतर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा सतत पूर्ण चेहऱ्याचे मास्क घालून फिरत होता. इतकेच नाहीतर सार्वजनिक ठिकाणीही राज कुंद्रा त्याच काळ्या मास्कमध्ये दिसत होता.
नुकताच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओमध्ये राज कुंद्रा याने मास्क घातले नसल्याने अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. इतकेच नाहीतर हा व्हिडीओ पाहून अनेकजण राज याला ट्रोल देखील करत आहेत.
यावर कमेंट करत एका युजर्सने लिहिले की, अॅडल्ट फिल्म्सच्या बाबाने तोंड लपवणे बंद केले…दुसऱ्याने लिहिले की, शिल्पा शेट्टी म्हटली वाटतं तोंड लपवले तर सोबत घेऊनच जाणार नाही…
आता राज कुंद्रा याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 2021 च्या पोर्नोग्राफी प्रकरणानंतर पहिल्यांदाच राज कुंद्रा हा बिना मास्कचा फिरताना दिसला.
अनेकांनी सोशल मीडियावर हा अंदाजा वर्तवला आहे की, पोर्नोग्राफी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने राज कुंद्रा हा खुश झाल्याने आता मास्क लावत नाही. शिल्पा शेट्टीच्या पतीचे नाव पोर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.