‘भोला’चा जबरदस्त असा ट्रेलर रिलीज, अक्षय देवगणचा लूक पाहून चाहत्यांमध्ये उत्साह, कपाळावर भस्म…

| Updated on: Mar 06, 2023 | 2:31 PM

अजय देवगण याच्या भोला चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता भोला चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.

भोलाचा जबरदस्त असा ट्रेलर रिलीज, अक्षय देवगणचा लूक पाहून चाहत्यांमध्ये उत्साह, कपाळावर भस्म...
Bholaa
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा त्याच्या आगामी भोला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आहे. भोला चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत होती. अजय देवगण याच्या दृश्यम 2 (Drishyam 2) चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाल केली होती. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा सर्वात अगोदर दृश्यम 2 हा चित्रपट ठरला. बाॅलिवूडच्या चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत असताना बाॅक्स आॅफिसवर (Box office) तूफान कामगिरी करण्यात दृश्यम 2 ला यश मिळाले. आता अजय देवगण याच्या भोला चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा नक्कीच आहेत.

अजय देवगण याच्या भोला चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे. आता नुकताच भोला चित्रपटाचा धमाकेदार 3D ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमधील उत्साह वाढल्याचे दिसत आहे. अजय देवगण याने रविवारी घोषणा केली होती, भोला चित्रपटाचे ट्रेलर उद्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

भोलाच्या रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये अजय देवगण याचा लूक जबरदस्त दिसत आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळताना देखील दिसत आहे. आज 6 मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता अजय देवगण याचा भोला चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

अजय देवगण याच्या दृश्यम 2 चित्रपटानंतर पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी नक्कीच केलीये. मात्र, त्यानंतर अक्षय कुमार याचा सेल्फी आणि कार्तिक आर्यन याचा शहजादा हे चित्रपट फ्लाॅप गेले. पठाण चित्रपट रिलीज झाल्यानंतर बाॅलिवूडच्या चित्रपटांना चांगले दिसत आल्याचे बोलले जात होते. मात्र, पठाण चित्रपट रिलीज झाल्यानंतर एका मागून एक असे दोन चित्रपट फ्लाॅप गेले आहेत.

अजय देवगण याच्या भोला चित्रपटामध्ये तब्बू देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. अजय देवगणचा भोला हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तब्बू या चित्रपटामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. भोलाच्या ट्रेलरमध्ये अजय देवगण वाईटाचा नाश करताना दिसत आहे. यासोबतच अजय देवगण कपाळावर भस्म लावून शत्रूंना धडा शिकवताना दिसत आहे. चाहत्यांना अजय देवगण याचा ट्रेलरमधील लूक प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. या महिन्यामध्ये रणबीर कपूर याचाही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.