मुंबई : नुकताच एक अत्यंत हैराण करणारी घटना पुढे आलीये. या घटनेनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. एका विषारी किड्याचा स्पर्श झाल्याने अभिनेत्याला थेट हार्ट अटॅकची लक्षणे दिसली. वेळेतच अभिनेता हा दवाखान्यात पोहल्याने अभिनेताचा जीव वाचू शकला आहे. अत्यंत हैराण करणारा प्रकार पुढे आलाय. आता अभिनेता थेट आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर अभिनेत्याचे चाहते हे त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. थोडक्यात अभिनेत्याचे प्राण वाचल्याचे बघायला मिळतंय.
हा अभिनेता पुर्तगाल की ट्रिपवर होता आणि त्यावेळीच हा हैराण करणारा प्रकार घडलाय. हाॅलिवूड अभिनेता जेमी डोर्नन याच्यासोबत हा प्रकार घडलाय. अभिनेता सध्या आयसीयूमध्ये असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विषारी किड्याचा संपर्क आला आणि अभिनेत्याला थेट हार्ट अटॅक आला. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.
अभिनेता हा पुर्तगालमध्ये सुट्टया घालवण्यासाठी एका रिसॉर्टमध्ये गेला. यावेळीचा हा प्रकार घडला. तब्येत अधिक खालावल्याने त्याला लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुरूवातीला अभिनेत्याला वाटले की, जास्त ड्रिंक्स केल्यामुळे त्याला त्रास होत आहे. मात्र, अभिनेत्याची तब्यते खालावत जात होती. त्याला नंतर कळाले की, हा त्रास आपल्याला कशामुळे होत आहे.
अभिनेत्याने सांगितले की, ट्रिपवर असताना ते मोठ्या अडचणीमध्ये सापडले. हेच नाही तर पाय सुन्न पडली होती. हार्ट अटॅकची पूर्ण लक्षणे दिसत होती. मी खूप जास्त हेल्दी व्यक्ती आहे आणि मी कधीच विचार करू शकत नव्हतो की, मलाही कधी हार्ट अटॅक येईल. त्याने सांगितले की, वीस मिनिटांमध्ये पूर्ण शरीर हे सुन्न पडले होते.
त्यानंतर पुढे जे काही झाले त्याबद्दल मला फार जास्त माहिती नाहीये. पुढे अभिनेता म्हणाला की, पुढे डाॅक्टरांनी मला फोन केला आणि त्यांनी काही धक्कादायक माहिती मला सांगितली. मला उशीरा समजले की, साउथ पुर्तगालमध्ये गोल्ड कोर्सवर कॅटरपिलर आहे. यामुळे कुत्र्यांचा निधन होत आहे आणि लोकांना हार्ट अटॅक येतोय.