मुंबई : बिग बाॅस फेम उर्फी जावेद सध्या चर्चेतील एक नाव आहे. अत्यंत कमी वेळामध्ये उर्फीने एक वेगळी ओळख नक्कीच मिळलीये. काहीजण उर्फीच्या कपड्यांवरून तिच्यावर टीका करतात, तर काहीजण उर्फीचे समर्थन देखील करतात. काहीतरी हटके करून उर्फी तिचे नाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अनेकदा सोशल मीडियावर उर्फीला तिच्या कपड्यांवरून प्रचंड ट्रोल केले जाते. मात्र, अशा लोकांना उर्फी दणदणीत प्रतिउत्तर देते. सध्या उर्फीच्या निशाण्यावर प्रसिध्द लेखक चेतन भगत हे आहेत.
एका कार्यक्रमादरम्यान चेतन भगत यांनी म्हटले होते की, उर्फी जावेद तिचे करिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. जरी लोक तिच्यावर टीका करत असतील तरीही ती तिचे करिअर तयार करते आहे. कारण उर्फीच्या फोटोला लाखांच्या घरात लाईक मिळतात, ही वस्तूस्थिती आहे.
एक वर्ग आहे जो उर्फीच्या फोटोंना लाईक करतो आणि पांघरूणामध्ये जाऊन तिचे फोटो पाहतो. मात्र, मला ऐवढेच म्हणायचे आहे की, दिवसातून चार ते पाच तास तुम्ही मोबाईलवर तुमचा महत्वाचा वेळ घालत आहात. त्याऐवजी तुम्ही पुस्तके वाचायला हवी.
चेतन भगत यांनी उर्फीबद्दल जे काही बोलले, ते उर्फीला अजिबातच पटल्याचे दिसत नाहीये. उर्फीने एक पोस्ट शेअर करत चेतन भगत यांच्यावर निशाना साधला. त्यानंतर चेतन भगत यांनीही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. आता चेतन भगत यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री चाहत खन्ना मैदानात उतरलीये.
चाहत खन्ना म्हणाली की, उर्फीबद्दल जे काही चेतन भगत म्हणाले आहेत. ते काहीच चुकीचे नाहीये, उलट त्यांनी साैम्य शब्दामध्ये उर्फीची तारीफच केली आहे. यामध्ये काहीच चुकीचे नाहीये. आता चाहत खन्ना हिच्या कमेंटनंतर उर्फी काय प्रतिक्रिया देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
उर्फी जावेदने चेतन भगतला रेपच्या संस्कृतीला प्रोत्साहन देऊ नका असे सांगून पोस्ट शेअर केली होती. पुरुषांच्या वागणुकीसाठी स्त्रियांच्या कपड्याला दोष देणे हे 80 च्या दशकातील असल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता हा वाद वाढण्याची दाट शक्यता आहे.