The Kerala Story Twitter Review | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला लोकांचा मिळतोय पाठिंबा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अनेकांनी केले काैतुक

| Updated on: May 05, 2023 | 4:14 PM

द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. नुकताच द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झालाय. अनेक वादांनंतर शेवटी चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे लोकांचा जबरदस्त असा प्रतिसाद हा चित्रपटाला मिळताना दिसतोय. लोक चित्रपटाचा सपोर्ट करताना दिसत आहेत.

The Kerala Story Twitter Review |  द केरळ स्टोरी चित्रपटाला लोकांचा मिळतोय पाठिंबा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अनेकांनी केले काैतुक
The Kerala Story
Follow us on

मुंबई : द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मोठा वादाला तोंड फुटले होते. अनेक संघटनांनी चित्रपटाच्या विरोधात कोर्टामध्ये धाव घेतली. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अशी परिस्थिती होती की, द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज होणार की नाही? मात्र, शेवटी मोठ्या वादानंतर अखेर चित्रपट (Movie) आज रिलीज झालाय. एकीकडे चित्रपटाबद्दल होणारा वाद आणि दुसरीकडे प्रेक्षकांचा मिळणार प्रतिसाद. द केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. सोशल मीडियावर (Social media) लोक चित्रपटाच्या सपोर्टमध्ये पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. थोडक्यात काय तर चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

द केरळ स्टोरी चित्रपटाची बाॅक्स आॅफिसवर एक हवा बघायला मिळत आहे. हा चित्रपट तूफान अशी कामगिरी करेल असे सांगितले जात आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट 10 कोटींची कमाई करेल असे रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले. इतकेच नाही तर शनिवार आणि रविवार चित्रपटाचा जलवा हा बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळेल. या चित्रपटाची अॅडवांस बुकिंग देखील जबरदस्त झालीये.

आता चित्रपट पाहून आलेल्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाचे काैतुक केले आहे. थोडक्यात काय तर चित्रपटाला लोक सपोर्ट करताना दिसत आहेत. द केरळ स्टोरी या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत आहे. अनेकांनी अदा शर्मा हिच्या अभिनयाचे काैतुक करत देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

द केरळ स्टोरी या चित्रपटात अदा शर्मा हिने शालिनी उन्नीकृष्णन हिचे पात्र साकारले आहे. हिंदू कुटुंबातील शालिनी ही फातिमा कशी बनली हे सर्व दाखवण्यात आले. हिंदू मुलींची फसवणूक त्यांचे धर्मपरिवर्तन केले जायचे हे सर्व ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्या हिंदू मुली कशाप्रकारे ISIS मध्ये गेल्या हे सर्व दाखवण्यात आले आहे.

फक्त शालिनी हिच नाही तर तिच्यासोबत 32 हजार मुलींसोबत हेच घडल्याचा दावा हा केला गेला. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. चित्रपटात अनेक दावे केल्या गेल्याचे देखील सांगितले जात आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्यानंतर चित्रपटाला देखील मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय.