फोटोमध्ये दारा सिंह यांच्यासोबत दिसत असलेला लहान मुलगा आता बाॅलिवूडमध्ये आहे सुपरहिरो, सासरे- सासू आणि पत्नी ही…

| Updated on: Dec 15, 2022 | 8:14 PM

आता तुमच्या लक्षात नक्कीच आले असेल की, दारा सिंह यांच्यासोबत दिसणारा हा लहान मुलगा कोण आहे...

फोटोमध्ये दारा सिंह यांच्यासोबत दिसत असलेला लहान मुलगा आता बाॅलिवूडमध्ये आहे सुपरहिरो, सासरे- सासू आणि पत्नी ही...
Follow us on

मुंबई : फोटोमध्ये दारा सिंह यांच्यासोबत एक लहान मुलगा दिसत आहे. मात्र, त्यावेळी दारा सिंह यांच्यासोबत या लहान मुलाला पाहून कोणीच विचार केला नसेल की, हा लहान मुलगा पुढे चालून आयुष्यामध्ये बाॅलिवूडचा सुपरस्टार ठरेल. दारा सिंह यांच्यासोबत जो लहान आणि निरागस मुलगा आहे तो गेल्या कित्येक वर्षांपासून बाॅलिवूडमध्ये धमाका करतोय. बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत याने करिअरच्या सुरूवातीला रोमांटिक चित्रपट केले आणि ते हीट देखील झाले. फोटोमध्ये दिसत असलेल्या या लहान मुलाला बाॅलिवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून देखील ओळखले जाते.

आता तुमच्या लक्षात नक्कीच आले असेल की, दारा सिंह यांच्यासोबत दिसणारा हा लहान मुलगा कोण आहे…दारा सिंह यांच्यासोबत दिसणारा हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अक्षय कुमार हा आहे.

अक्षय कुमार याने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हीट चित्रपट केले आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी अक्षय कुमार याचे तब्बल 4 ते 5 चित्रपट बाॅक्स आॅफिसवर प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

अक्षय कुमार याने सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या मुलीसोबत विवाह केला. दारा सिंह यांच्यासोबतचा फोटो पाहून कोणी त्यावेळी विचार केला असेल का, हा मुलगा मोठा झाल्यावर इंडस्ट्रीमधील पहिल्या सुपरस्टारच्या मुलीसोबत लग्न करेल…

अक्षय कुमार याची पती ट्विंकल खन्ना ही देखील एकेकाळी फेमस अभिनेत्री होती. इतकेच नाहीतर ट्विंकल खन्ना हिची आई डिंपल कपाडिया या देखील बाॅलिवूडच्या फेमस अभिनेत्री होत्या.

अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांमुळे कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला नकार दिला आहे. त्याला या चित्रपटाचे स्क्रीप्ट आवडले नसल्याने त्याने नकार दिला.

बाॅक्स आॅफिसवर अक्षय कुमार याचे दोन चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षय याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले होते की, यावेळी काहीतरी नवीन करतो…