मुंबई : चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. इतकेच नाहीतर आता सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये चांगलेच युध्द सुरू आहे. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांना जोरदार प्रतिउत्तर देताना दिसत आहेत. विवेक अग्निहोत्री हे बाॅलिवूड चित्रपटांवर सतत टीका करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात असतानाच अनुराग कश्यप म्हणाले की, पुष्पा आणि कांतारा यासारख्या चित्रपटांमुळे इंडस्ट्री बर्बाद होत आहे. याचाच समाचार विवेक अग्निहोत्री यांनी घेतला आणि या दोघांमध्ये ट्विट वार सुरू झाला.
विवेक अग्निहोत्री यांच्या टिकेला उत्तर देताना अनुराग कश्यप यांनी म्हटले होते की, तुमच्या चित्रपटांचे संशोधनही असेच होते, जसे माझ्या बोलण्यावर तुमचे हे ट्विट आहे…
आता अनुराग कश्यपच्या याच ट्विटला विवेक अग्निहोत्री यांनी चांगलाच रिप्लाय करत अनुराग कश्यप यांचा समाचार घेतला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की…
Bholenath, aap lage haath sabit kar hi do ki #TheKashmirFiles ka 4 saal ka research sab jhooth tha. Girija Tikoo, BK Ganju, Airforce killing, Nadimarg sab jhooth tha. 700 Panditon ke video sab jhooth the. Hindu kabhi mare hi nahin. Aap prove kar do, DOBAARA aisi galti nahin hogi. https://t.co/jc5g3iL4VI
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) December 14, 2022
भोलेनाथ हे सिध्द करा की चार वर्षांचे ‘काश्मीर फाइल्स’चे संशोधन सर्व खोटे होते…गिरिजा टिक्कू, बीके गंजू, एयरफोर्स किलिंग, नदीमर्ग हे सर्वकाही खोटे होते…700 पंडितांचे व्हिडीओ देखील खोटे होते…
हिंदू कधी मेलेच नाहीत… सिद्ध करून दाखवा… अशी चूक पुन्हा होणार नाही. आता विवेक अग्निहोत्री यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आता यावर अनुराग कश्यप काय प्रतिक्रिया देतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.