The Kerala Story 2 | ‘द केरळ स्टोरी’चा पार्ट 2 येऊ शकतो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दिग्दर्शकाने दिले मोठे संकेत

| Updated on: May 15, 2023 | 4:32 PM

द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटाला मोठा विरोध होताना दिसले. काहींनी चित्रपटावर बंदी घालण्यासाठी थेट कोर्टात धाव घेतली. द केरळ स्टोरी चित्रपटाचा वाद कमी होण्याचे चिन्ह नाहीये. दोन राज्यांमध्ये द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी आहे.

The Kerala Story 2 | द केरळ स्टोरीचा पार्ट 2 येऊ शकतो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दिग्दर्शकाने दिले मोठे संकेत
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : सध्या फक्त आणि फक्त ‘द केरळ स्टोरी‘ (The Kerala Story) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिवर तूफान कामगिरी करण्यास सुरूवात केलीये. विशेष म्हणजे द केरळ स्टोरी चित्रपटाने 10 दिवसांमध्ये तब्बल 135 कोटींची कमाई केलीये. भारतामध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झाला. एकून 37 देशांमध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट (Movie) 12 मे रोजी रिलीज झाला. विशेष बाब म्हणजे द केरळ स्टोरी चित्रपटाला फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील प्रचंड असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मुळात म्हणजे द केरळ स्टोरी चित्रपटाला गेल्या काही दिवसांपासून मोठा विरोध होताना दिसत आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल (West Bengal) या राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी देखील घालण्यात आलीये.

द केरळ स्टोरी चित्रपटाची सतत मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे द केरळ स्टोरी चित्रपटाचे प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. अदा शर्मा ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून अदा शर्मा हिच्या अभिनयाचे काैतुक हे केले जात आहे. धमाकेदार कामगिरी द केरळ स्टोरी हा चित्रपट करताना दिसत आहे. अनेकांनी या चित्रपटाला विरोध केलाय.

द केरळ स्टोरी चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन हे देखील सतत चर्चेत आहेत. नुकताच सुदीप्तो सेन यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतमध्ये ते म्हणाले की, अनेक चित्रपट निर्माते हे माझ्याकडे पैसे घेऊन येत आहेत आणि मला द केरळ स्टोरी 2 ची आॅफर करत आहेत. माझ्यासाठी खरोखरच ही खूप जास्त आनंदाची बाब आहे. मी द केरळ स्टोरी चित्रपटावर सात वर्ष काम केले.

माझ्याकडे बऱ्याच स्टोरी आहेत. द केरळ स्टोरी चित्रपटाला अशाप्रकारचा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळेल, याची कल्पना मला अगोदरच होती. द केरळ स्टोरी चित्रपटामुळे मला गर्व वाटत असून माझा आत्मविश्वास देखील वाढलाय. सुदीप्तो सेन यांचे बोलणे ऐकून हा अंदाजा लावला जात आहे की, लवकरच द केरळ स्टोरी चित्रपटाला सीक्वल प्रेक्षकांचा भेटीला येऊ शकतो. धमाकेदार ओपनिंगही द केरळ स्टोरी चित्रपटाने केलीये.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुदीप्तो सेन यांनी द केरळ स्टोरी चित्रपटाला सुरू असलेल्या विरोधावर देखील भाष्य केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, लोक माझ्या चित्रपटाला विरोध नेमके का करत आहेत हेच मला मुळात कळत नाहीये. मी या स्टोरीवर सात वर्ष काम केले असून सर्व कागदपत्र देखील माझ्याकडे आहेत. द केरळ स्टोरी हा चित्रपट दोन राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे.