Pushpa 2: The Rule | प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, अखेर या दिवशी रिलीज होणार पुष्पा 2 चा फर्स्ट लूक

| Updated on: Feb 28, 2023 | 9:58 PM

पुष्पा 2 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. पुष्पाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला होता.

Pushpa 2: The Rule | प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, अखेर या दिवशी रिलीज होणार पुष्पा 2 चा फर्स्ट लूक
Follow us on

मुंबई : पुष्पा : द राइज या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाल केली होती. मुळात म्हणजे कोरोनानंतर चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात असताना अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या चित्रपटाने धमाका केला. या चित्रपटाचे वेड चाहत्यांमध्ये बघायला मिळत होते. जिकडे बघावी तिकडे फक्त आणि फक्त पुष्पा चित्रपटाची चर्चा होती. लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसले. या चित्रपटामधील अनेक डाॅयलाॅग देखील फेमस झाले. पुष्पा चित्रपटाला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. या दरम्यान बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे बिग बजेटचे चित्रपट फ्लाॅप जात होते आणि दुसरीकडे पुष्पा तूफान कामगिरी करत होता.

पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झालीये. काही दिवसांपूर्वी पुष्पा चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले होते की, चित्रपटाला इतका जास्त प्रतिसाद मिळेल, असे अजिबात वाटले नव्हते. आम्ही म्हणावे तसे चित्रपटाचे प्रमोशनही केले नाही.

पुष्पा चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आता एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच पुष्पाच्या सीक्वलचे काम सुरू करण्यात आलंय. विशेष म्हणजे अल्लू अर्जुन चित्रपटाचे शूटिंग करताना विशाखापट्टणम येथे दिसला होता. विशेष म्हणजे आता रिपोर्टनुसार चित्रपटाच्या टीजरची तारीखही पुढे आलीये.

अल्लू अर्जुन याच्या वाढदिवसाच्या दिवशी पुष्पाः द रूलची झलक बघायला मिळणार आहे. म्हणजेच 8 एप्रिल रोजी चाहत्यांना अल्लू अर्जुन याच्या पुष्पाः द रूल चित्रपटाचे टीजर बघायला मिळणार. चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्टारच्या वाढदिवसाला चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जातंय.

विशाखापट्टणमनंतर आता हैदराबाद येथे चित्रपटाची शूटिंग केले जाणार आहे. आरआरआर चित्रपटाचा अभिनेता राम चरण देखील ‘पुष्पा: द रूल’मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, यावर अजून निर्मात्यांकडून काही खुलासा करण्यात नाही आला. मात्र, चित्रपटाचे टीजर 8 एप्रिलला रिलीज होणार म्हटल्यावर चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे.

सध्या बाॅक्स आॅफिसवर शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाला जलवा बघायला मिळत आहे. या चित्रपटाने बाहुबली 2 चा रेकाॅर्ड आपल्या नावावर करत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. कोरोनानंतर बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट धमाका करू शकत नव्हते. दुसरीकडे साऊथचे चित्रपट तूफान कामगिरी करत होते. आता पुष्पा 2 ची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.