विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सची (The Kashmir Files) कमाई दुसऱ्या आठवड्यात हळूहळू कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी 13 दिवसांत या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. बुधवारी (23 मार्च) या चित्रपटाने 10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कोरोना महामारीनंतरचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) या चित्रपटाच्या एकूण कमाईलाही द काश्मीर फाईल्सने मागे टाकलं आहे. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची मन हेलावणारी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. देशातील काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री घोषित करण्यात आला. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार, चिन्मय मांडलेकर यांच्यासह इतरही नामांकित कलाकारांच्या भूमिका आहेत.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने या चित्रपटाच्या कमाईचा आकडा ट्विटरवर पोस्ट केला आहे. 13 दिवसांत या चित्रपटाने 200.13 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचा फटका अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटालाही बसला. बच्चन पांडेने पाच दिवसांत जवळपास 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ने देशभरात चर्चा घडवून आणली आहे. लोकसभा, राज्यसभेतही या चित्रपटाचा विषय गाजला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आणि देशभर त्याच गोष्टीवरून सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या.
#TheKashmirFiles crosses ₹ 200 cr mark … Also crosses *lifetime biz* of #Sooryavanshi… Becomes HIGHEST GROSSING *HINDI* FILM [pandemic era]… [Week 2] Fri 19.15 cr, Sat 24.80 cr, Sun 26.20 cr, Mon 12.40 cr, Tue 10.25 cr, Wed 10.03 cr. Total: ₹ 200.13 cr. #India biz. pic.twitter.com/snBVBMcIpm
— taran adarsh (@taran_adarsh) March 24, 2022
शुक्रवार- 19.15 कोटी रुपये
शनिवार- 24.80 कोटी रुपये
रविवार- 26.20 कोटी रुपये
सोमवार- 12.40 कोटी रुपये
मंगळवार- 10.25 कोटी रुपये
बुधवार- 10.03 कोटी रुपये
एकूण- 200.13 कोटी रुपये
कथा काल्पनिक असल्याच्या आरोपांवर पल्लवी जोशींचं उत्तर
1990 मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर जो अत्याचार झाला, तोच पडद्यावर मांडल्याचा दावा अग्निहोत्री करत आहेत. मात्र यावर अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं आहे. विवेकने या चित्रपटाच्या संशोधनासाठी अनेक वर्षे मेहनत केली असून त्यांच्याकडे 4000 तासांचे रिसर्च व्हिडीओज असल्याचं पल्लवी यांनी म्हटलंय.
हेही वाचा: