रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’ (Brahmastra) हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत जगभरात तब्बल 160 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी चित्रपटाच्या कमाईवरून (box office collection) टोला लगावला आहे. त्यांनी ब्रह्मास्त्रच्या कमाईवरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटवरून उलट नेटकरी त्यांनाच ट्रोल करत आहेत.
विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं, ‘हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल के खुश रखने को ‘गालिब’ ये खयाल अच्छा है’ (स्वर्गाचं सत्य आम्हाला माहीत आहे, मात्र मनाला खूश ठेवण्यासाठी गालिब यांचे हे विचार चांगले आहेत). यासोबतच त्यांनी ‘बॉलिवूड’ आणि ‘ग्रॉस’ असे दोन हॅशटॅग दिले आहेत. यावरून त्यांनी अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रला टोला लगावल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.
हमको मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन⁰दिल के ख़ुश रखने को ‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है। #Bollywood #Gross
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) September 11, 2022
‘किती असुरक्षित आहात, इतर चित्रपटांचं यश तुम्ही साजरं केलं पाहिजे’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘ज्या बॉलिवूडने तुम्हाला विवेक अग्निहोत्री बनवलं, त्याच बॉलिवूडच्या एका चित्रपटाचं यश तुम्हाला पचत नाहीये’, असा टोमणा दुसऱ्या नेटकऱ्याने मारला.
Ghazab hai jis Bollywood ne tujhe vivek agnihotri banaya aaj uski ek hit film tujhe pach nahin rahi hai ?
— M khan (@SahilKhanz) September 11, 2022
Frustrated Sore loser hona bhi kabhi kabhi acha hain Ghalib jo aap Ho rahe Ho !!! Milte hain end of weekend aur end of the week tab tak sulking chalu rakhiye
— munaf (@munafno1) September 11, 2022
— Sajan Randhawa (@Certified_Fan_) September 11, 2022
ब्रह्मास्त्र- पार्ट वन शिवा या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचसोबत शाहरुख खान यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 410 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे.
शुक्रवार- 75 कोटी रुपये
शनिवार- 85 कोटी रुपये
एकूण- 160 कोटी रुपये