मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे देखील अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहेत. त्यांचा सिनेमा बनवतानाचा दृष्टीकोन, त्यांची विचारसरणी यामुळे सध्या ते चर्चेत आलेत. त्यांचा एक टोपी घालून दुआ मागतानाचाही जुना फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. अश्यात त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर ‘मी टू‘चे (Me Too) आरोप केले. हे आरोप सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.
तनुश्रीचे आरोप
तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्री यांच्यावर ‘मी टू’चे आरोप केले. हे आरोप सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. तनुश्रीने 2005 मध्ये चॉकलेट सिनेमा केला होता. यावेळी विवेक यांनी आपल्याकडे चुकीच्या गोष्टींची मागणी केल्याचा आरोप तनुश्रीचा आहे. यावेळी अभिनेता इरफान खान आणि सुनिल शेट्टीने आपली बाजू घेतल्याचा दावाही तनुश्रीचा आहे. तिच्या या आरोपांवर विवेक यांनीही स्पष्टीकरण दिलं. तनुश्रीने पब्लिसिटीसाठी हे आरोप केले असल्याचं विवेक यांचं म्हणणं आहे. काही दिवसांआधी तनुश्रीने डीएनए या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली होती. तेव्हा तिने केलेले आरोप सध्या व्हायरल होत आहेत.
Actress Tanushree Dutta has revealed a shocking account. She has accused director @VivekAgnihotri of inappropriate behaviour on the sets of her debut movie ‘Chocolate: Deep Dark Secrets’. On the pretext of giving cues to @irrfank, Agnihotri asked her to strip naked and dance. https://t.co/tBJpjxV9Ix
— Nilanjan Das (@NilanjanDasAITC) March 20, 2022
तनुश्रीचे नाना पाटेकर यांच्यावरचे आरोप
काही दिवसांआधी तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावरही आरोप केले होते. 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटासाठी एका स्पेशल गाण्याचे चित्रीकरण सुरू होतं. नाना पाटेकर यांनी या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. चित्रीकरणाच्या करारानुसार ते गाणं खरंतर केवळ माझ्या एकटीवर चित्रीत होणं अपेक्षित होतं. मी हा प्रकार दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगितला, पण त्यांनीही मला नाना पाटेकर सांगतील तसं करण्यास सांगितलं, असा खळबळजनक आरोप तनुश्रीने नाना पाटेकरांवर केला होता. सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभे राहिलं नाही, सगळ्यांनीच यावेळी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असंही ती म्हणाली होती.
I was waiting for #Bollywood to hit back at Vivek Agnihotri and it finally comes. Legacy media like @timesofindia is being used to peddle a Tanushree Dutta sexual harassment charge. It is a well-known fact that she couldn’t prove it. She tried the same with Nana Patekar. Sigh
— Smita Deshmukh ?? (@smitadeshmukh) March 21, 2022
संबंधित बातम्या