‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा वाद वाढणार? पश्चिम बंगालमधील चित्रपटाच्या बंदी विरोधात निर्मात्यांनी ठोठावला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा

| Updated on: May 09, 2023 | 9:54 PM

द केरळ स्टोरी चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. या चित्रपटाने सोमवारी देखील धमाकेदार कमाई केलीये. मात्र, चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले असताना चित्रपटाचा वाद कमी होताना दिसत नाहीये.

द केरळ स्टोरी चित्रपटाचा वाद वाढणार? पश्चिम बंगालमधील चित्रपटाच्या बंदी विरोधात निर्मात्यांनी ठोठावला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा
Follow us on

मुंबई : द केरळ स्टोरी चित्रपटाचा वाद वाढताना दिसतोय. द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झालाय. मात्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये चित्रपटावर बंदी घातली गेलीये. द केरळ स्टोरी चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त असा प्रतिसाद मिळत असताना सर्वांना मोठा धक्का देत तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील सरकारने मोठा निर्णय घेत चित्रपटावर बंदी घातलीये. द केरळ स्टोरी चित्रपटाच्या सपोर्टमध्ये लोक दिसत असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाला सपोर्ट करत आहेत. विशेष म्हणजे धमाकेदार ओपनिंग या चित्रपटाने केलीये. विकेंडलाही चित्रपट (Movie) तूफान कामगिरी करताना दिसलाय.

तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यात चित्रपटावर बंदी घातल्यानंतर द केरळ स्टोरी चित्रपटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीये. निर्मात्यांचे म्हणणे आहे की, CBFC च्या मंजुरीनंतर राज्य सरकार चित्रपटांवर बंदी घालूच शकत नाही. याचिकाकर्त्याचे वकील उद्या या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती सरन्यायाधीशांना करू शकतात. मात्र, द केरळ स्टोरी चित्रपटामुळे वातावरण तापल्याचे दिसत आहे.

तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यात चित्रपटावर बंदी घातली गेली आहे तर दुसरीकडे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. कोचीमध्येही अनेक थिएटरमध्ये द केरळ स्टोरी चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले आहेत. मुळात म्हणजे द केरळ स्टोरी चित्रपटाला टिझर रिलीज झाल्यापासूनच मोठा वाद हा सातत्याने बघायला मिळतोय.

द केरळ स्टोरी चित्रपटाने चार दिवसांमध्ये 45 कोटींची कमाई केलीये. विशेष म्हणजे दोन राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी असताना देखील चित्रपट धमाल करताना नक्कीच दिसत आहे. सोमवारी देखील चित्रपटाने चांगली कमाई केलीये. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळत आहे.

द केरळ स्टोरी चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला होता. दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले होते की, मी या चित्रपटाच्या स्टोरीवर सात वर्ष काम केले आहे. इतकेच नाही तर अनेक कागदपत्रे देखील आम्ही गोळा केली. द कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या अगोदरच्या यावर मी काम करत होतो. द कश्मीर फाईल्स आणि द केरळ स्टोरी हे दोन्ही चित्रपट वेगळे आहेत.