मुंबई : राणी मुखर्जी ही तिच्या मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे (Mrs Chatterjee Vs Norway) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. राणी मुखर्जी हिचा हा चित्रपट 17 मार्च रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे राणी मुखर्जी (Rani Mukerji) हिच्या चित्रपटासोबत कपिल शर्मा याचा ज्विगाटो हा चित्रपटही रिलीज झालाय. कपिल शर्मा हा त्याच्या ज्विगाटो चित्रपटाचे (Movie) जोरदार प्रमोशन करताना दिसला. यावेळी कपिल शर्मा याने काही मोठे खुलासे देखील केले. आपण डिप्रेशनमध्ये असताना थेट दारू पिऊन अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी गेलो होतो. डिप्रेशनचा काळ आपल्यासाठी किती जास्त वाईट होता हे सांगताना कपिल शर्मा दिसला.
मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटाच्या माध्यमातून राणी मुखर्जी हिने जोरदार बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटात राणी मुखर्जी हिने धमाकेदार भूमिका केलीये. सर्वांनीच राणी मुखर्जी हिचे या चित्रपटासाठी काैतुक केले आहे. राणी मुखर्जी हिचा चित्रपट बाॅक्स आॅफिसवरही धमाका करताना दिसतोय.
आता राणी मुखर्जी हिच्या मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वेचे नवव्या दिवशीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पुढे आले आहे. तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे चित्रपटाचे कलेक्शन सांगितले आहे. मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे चित्रपटाने नवव्या दिवशी धमाकेदार कमाई केलीये.
मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे चित्रपटाने नवव्या दिवशी 1.63 कोटींचे कलेक्शन केले आहे. आता राणी मुखर्जी हिच्या चित्रपटाचे ऐकून बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे 13.05 कोटी झाले आहे. राणी मुखर्जी हिच्या मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे चित्रपटाकडून मोठ्या कलेक्शनच्या अपेक्षा होत्या. मात्र, तेवढा धमाका करण्यात चित्रपटाला यश मिळाले नाहीये.
मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे चित्रपटाच्या कमाईमध्ये सतत चढउतार दिसत आहेत. रविवारी बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कपिल शर्मा याचा चित्रपट फ्लाॅप जाण्याच्या मार्गावर आहे. कपिल शर्मा याच्या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाहीये.
कपिल शर्मा, राणी मुखर्जी यांच्यासोबत रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट देखील बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसतोय. रणबीर कपूर याच्या चित्रपटाच्या अगोदर अक्षय कुमार याचा सेल्फी आणि कार्तिक आर्यन याचा शहजादा हे चित्रपट फ्लाॅप गेले होते. यामुळे रणबीर कपूर याचा चित्रपट काय धमाका करतो, याकडे सर्वांच्या नजरा होत्या.