मुंबई : द केरळ स्टोरी चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले. गेल्या काही महिन्यांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट मोठ्या वादात सापडला होता. सतत या चित्रपटाच्या अडचणीमध्ये देखील मोठी वाढ होताना दिसत होती. मात्र, शेवटी मोठ्या वादानंतर हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे चित्रपट (Movie) रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद दिसत होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाका करताना दिसतोय.
द केरळ स्टोरी चित्रपटाची ओपनिंग धमाकेदार होईल असा अंदाजा सुरूवातीपासूनच वर्तवला जात होता. शेवटी तेच खरे ठरले. नुकताच द केरळ स्टोरी चित्रपटाचे ओपनिंग डेचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे पुढे आले असून शुक्रवारी चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केलाय. विकेंडचा फायदा हा चित्रपटाला अधिक होईल, असे देखील सांगितले जात आहे.
द केरळ स्टोरी चित्रपटाने ओपनिंग डेला भारतामधून 8.3 कोटींचे कलेक्शन केले आहे. विशेष म्हणजे पुढील काही दिवस हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर जबरदस्त अशी कामगिरी करेल असे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर अनेकजण पोस्ट शेअर करत चित्रपटाचा सपोर्ट करताना दिसत आहेत. अनेकांनी चित्रपट निर्मात्यांचे देखील काैतुक केले आहे.
द केरळ स्टोरी चित्रपटाची स्टोरी ही केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे. ज्यांचे धर्मांतर करण्यासाठी आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी ब्रेनवॉश केले गेले. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला. अनेकांनी थेट या चित्रपटाच्या विरोधात कोर्टात धाव घेत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
द केरळ स्टोरी चित्रपटाला होणारा विरोध पाहून कोची येथील अनेक थिएटर मालकांनी चित्रपटाचे शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. अगोदर हा चित्रपट 50 ठिकाणी प्रदर्शित केला जाणार होता. मात्र, त्यानंतर मोठा निर्णय घेत थिएटर मालकांनी चित्रपटाचे शो रद्द केले. कोचीमध्ये आता फक्त 17 ठिकाणी द केरळ स्टोरी चित्रपट दाखवला जात आहे. हा चित्रपट पुढील काही दिवसांमध्ये बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे मात्र बघण्यासारखे ठरणार आहे.