मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या आगामी पठाण या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने या वादाला खरी सुरूवात झाली. इतकेच नाहीतर थेट अनेकांनी चित्रपटामधील बेशर्म रंग हे गाणे हटवण्याची मागणी देखील करून टाकली. काही राजकिय मंडळींनी देखील या गाण्याचा विरोध केला. परंतू हे सर्व सुरू असतानाच हे गाणे आता हीट ठरले आहे.
शाहरुख खान याचे चाहते पठाण चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात आहेत. परंतू चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाल्यापासून मोठा गोंधळ निर्माण झाला. अनेकांनी हे गाणे पाहून दीपिका आणि शाहरुख खान यांच्यावर टीका देखील केली.
नुकताच या चित्रपटातील दुसरेही गाणे रिलीज करण्यात आले आहे. शाहरुख खान याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत. दोन दिवसांपूर्वीच चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा फर्स्ट लूक आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता.
पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाण्यावरून विवाद सुरू असतानाच या गाण्याने दहा दिवसांमध्ये तब्बल 100 मिलियन व्ह्यूज कमावले आहेत. या गाण्यामुळे वाद सुरू झाल्याने अनेकांनी हे गाणे पाहिल्याने याचा फायदा झाला आहे.
बेशर्म रंग गाण्यावरून सुरू झालेल्या वादाचा फायदा हा झाल्याचे दिसत आहे. फक्त दहा दिवसांमध्ये गाण्याने इतकेच जास्त व्ह्यूज मिळवले आहे. आता हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनंतर पठाण या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. पठाणनंतर लगेचच शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येईल. सध्या डंकी या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.