‘या’ व्यक्तीच्या आठवणीत व्याकूळ होऊन जगजीत सिंह यांनी गायले होते गाणे, वाचा ‘चिट्ठी ना कोई संदेश’ गाण्याचा किस्सा

| Updated on: Oct 12, 2021 | 8:18 AM

जगात गझल सम्राट म्हणून प्रसिद्ध जगजीत सिंह यांना जाऊन नुकतीच 10 वर्षे झाली आहेत. जगजीत सिंह यांनी 10 ऑक्टोबर 2011 रोजी या जगाचा निरोप घेतला. पण, आजही त्यांचा आवाज आणि त्यांच्या गझल लोकांच्या मनात जिवंत आहेत. जगजीत सिंग यांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा आहेत.

‘या’ व्यक्तीच्या आठवणीत व्याकूळ होऊन जगजीत सिंह यांनी गायले होते गाणे, वाचा ‘चिट्ठी ना कोई संदेश’ गाण्याचा किस्सा
Jagjit Singh
Follow us on

मुंबई : जगात गझल सम्राट म्हणून प्रसिद्ध जगजीत सिंह यांना जाऊन नुकतीच 10 वर्षे झाली आहेत. जगजीत सिंह यांनी 10 ऑक्टोबर 2011 रोजी या जगाचा निरोप घेतला. पण, आजही त्यांचा आवाज आणि त्यांच्या गझल लोकांच्या मनात जिवंत आहेत. जगजीत सिंग यांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा आहेत. या कथा त्यांच्या प्रेम, त्यांचे करिअर आणि चित्रपट प्रवासाशी संबंधित आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, ‘चिट्ठी ना कोई संदेश’ हे गाणे त्यांनी एका व्यक्तीच्या आठवणी गायले आहे.

जगजीत सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी आणि गझल दिली आहेत. यामध्ये ‘होठों से छू लो तुम’, ‘तुमको देखा तो ख्याल आया’, ‘कागज की कश्ती’, ‘कोई फरियाद’ अशा एकापेक्षा एक गाण्यांचा समावेश आहे.

जगजीत सिंह आणि त्यांचे कुटुंब राजस्थानचे आहे. त्यांचा जन्म श्रीगंगानगर शहरात झाला. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. घरात अनेक भावंडे होती आणि वडिलांच्या सांगण्यावरून त्यांचे नाव जगमोहन ठेवले गेले. पण तेव्हा कुणालाही माहीत नव्हते की, आपल्या घरात जन्मलेला हा सूर आपल्या आवाजाने संपूर्ण जगाला मोहित करेल.

मुलाच्या दुःखात गायले ‘चिट्ठी ना कोई संदेश’ गाणे

जगजीत सिंह यांनी ‘दुश्मन’ चित्रपटासाठी ‘चिट्ठी ना कोई संदेश’ हे प्रसिद्ध गाणे गायले आहे. लोकांना हे गाणे खूप आवडले. पण असे म्हटले जाते की, जगजीत सिंह यांनी हे गाणे एखाद्या खास व्यक्तीसाठी गायले आहे. वास्तविक जगजीत सिंह आणि त्यांची पत्नी आणि गायिका चित्रा यांना एक मुलगा होता, ज्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे जगजीत आणि चित्रा दोघेही हादरले होते. या अपघातात दोघेही इतके तुटले होते की, त्यांनी स्वतःला संगीतापासून दूर केले होते.

पण सर्व दु:ख दूर करत त्यांनी स्वतःला सावरलं. स्वतःची काळजी घेतली आणि ते पुन्हा परत आले. त्यांनी ‘चिट्ठी ना कोई संदेश’ या गाण्यात आपली संपूर्ण वेदना व्यक्त केली. त्यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ हे गाणे गायले आहे. हे गाणे खूप लोकप्रिय झाले, आजही ते यूट्यूबवर लाखो वेळा ऐकले गेले आहे.

जगजीत सिंह यांचा आवाज सदैव राहील अमर!

जगजीत सिंह यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना 1998 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 2003मध्ये जगजीत सिंह यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. एवढेच नव्हे तर, 2014 मध्ये सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीटही जारी केले. आज ते आपल्यात नाही, पण त्याचा आवाज आजही अजरामर आहे.

हेही वाचा :

पान मसाला ब्रँडपासून अमिताभ बच्चन यांची फारकत, मानधनाचे पैसे परत करत रद्द केला जाहिरात करार!

Ankita Lokhande | अंकिता लोखंडे म्हणाली- ‘भाड़ में गया प्यार-व्यार’, VIDEO पाहून बॉयफ्रेंड विक्की जैनचे टेन्शन वाढले !