मुंबई : अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राम सेतू चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट मिळतंय. अक्षयचा हा चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याअगोदर अक्षयने एक खास अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये. यापूर्वी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा चित्रपट (Movie) रक्षाबंधन बाॅक्स आॅफिसवर धमाल करू शकला नाहीये. त्यामुळे अक्षयच्या या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. अक्षयच्या राम सेतू (Ram Setu) या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची क्रेझ आहे.
The eagerness with which you are waiting for the #RamSetu trailer is making us work even harder.We are so grateful for the love you showed on the teaser.
To answer the burning question.The Ram Setu trailer will be out on 11th Oct.Get ready to deep dive into the world of Ram Setu pic.twitter.com/iwGyl9qzQt— Akshay Kumar (@akshaykumar) October 5, 2022
अक्षय कुमारचा राम सेतू आणि अजय देवगणचा थँक गॉड हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. यामुळे कोणता चित्रपट बाॅक्स आॅफिसवर वरचढ ठरतोय हे बघण्यासारखे ठरणारय. राम सेतूची पहिली झलक निर्मात्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली होती. चाहते देखील गेल्या अनेक दिवसांपासून अक्षयच्या चित्रपटाची वाट पाहात आहेत.
अक्षय कुमार चाहत्यांसाठी चित्रपटाच्या सेटवरील काही ना काही फोटो कायमच शेअर करतो. नुकताच अक्षय कुमारने राम सेतू चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अक्षयचा लूक जबरदस्त दिसतोय. अक्षयच्या चाहत्यांना त्याचा हा लूक प्रचंड आवडलाय. चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करण्यासोबतच अक्षयने खास कॅप्शनही दिले आहे. अक्षयने या फोटोसोबत चित्रपटाच्या ट्रेलरची तारीखही जाहीर केलीये. 11 ऑक्टोबरला चित्रपटाचे ट्रेलर रिलीज होणार आहे.