मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. शाही थाटात कियारा आणि सिद्धार्थ यांचे लग्न पार पडणार असल्याचे सांगितले जातंय. हे लग्न राजस्थानमध्ये होणार असून ६ फेब्रुवारीला सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी लग्नबंधणात अडकणार आहेत. कियारा आडवाणी हिच्यासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर बोलताना सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला होता की, मी सर्व गोष्टी वाचल्या आहेत. परंतू मलाच अजून कोणी लग्नासाठी बोलावले नाहीये. लोकांनी माझ्या पर्सनल लाईफवर जास्त लक्ष देण्यापेक्षा माझ्या चित्रपटांवर (Movie) जास्त लक्ष द्यावे, असेही सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला होता.
सिद्धार्थ मल्होत्रा हा फक्त कियारा आडवाणी हिच्यासोबतच्या लग्नामुळेच चर्चेत नाहीये. तर सिद्धार्थ मल्होत्रा याच्या मिशन मजनू या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालायं. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत साऊथ स्टार रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत आहे.
रिलीज झालेल्या मिशन मजनूच्या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा एका वेगळ्या अंदाजामध्ये दिसत आहे. या ट्रेलरमध्ये काही पाकिस्तानी पात्रेही दाखवण्यात आली आहेत. यामुळे आता हे ट्रेलर पाकिस्तानमध्ये जोरदार ट्रोल केले जातंय.
मिशन मजनू या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा हा एका रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. पाकिस्तानमध्ये एका खास मोहिमेसाठी सिद्धार्थ गेल्याचे दाखवण्यात आले असून तिथे तो लग्न देखील करतो.
ट्रेलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा याने सुरमा आणि टोपी घातल्याचे दिसत असून तो आदाब आणि जनाब असे शब्द बोलताना दिसत आहे. मिशन मजनूचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून पाकिस्तानमध्ये हे ट्रोल केले जात आहे.
एका पाकिस्तानी पिझ्झा ब्रँडने तर थेट बॉलिवूडलाच ट्रोल केले आहे. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी पिझ्झा ब्रँडचा एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये मुस्लिम टोपी बर्गरला घातल्याचे दाखवण्यात आलंय. मिशन मजनू हा चित्रपट 20 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.
मिशन मजनू या चित्रपटाची चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चित्रपटाबद्दल अजून आतुरता चाहत्यांमध्ये वाढली आहे. आता हा चित्रपट 20 जानेवारीला काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा हा मिशन मजनू या चित्रपटामध्ये एका वेगळ्या भूमिकेत असणार आहे. यापूर्वी प्रेक्षकांनी सिद्धार्थ मल्होत्रा याचा असा लूक कधीही बघितला नव्हता. या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा आहेत.