मुंबई : हनी सिंह गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मात्र तो त्याच्या करिअरमुळे चर्चेत नसून त्याच्या पर्सनल लाईफमुळे आहे. नुकताच त्याने पत्नी शालिनी तलवार हिच्यासोबत घटस्फोट घेतला आहे. हनी सिंह आणि शालिनी यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सुरूवातीला चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. काहींना वाटले होते की, या फक्त आणि फक्त अफवा आहेत. परंतू आता खरोखरच हनी सिंह आणि शालिनी तलवार यांचा घटस्फोट झालाय. आता हनी सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
हनी सिंह याला घटस्फोट होऊन काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा प्रेम झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हनी सिंह हा फेमस मॉडेल टीना थडानीचा हात पकडून चालतो आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होत्या की, हनी सिंह हा मॉडेल टीना थडानी हिला डेट करतोय. हा व्हिडीओ पाहून तर हे आता नक्कीच झाले आहे की, हनी सिंह आणि टीना थडानी एकमेकांना डेट करत आहेत.
एका कार्यक्रमामध्ये हनी सिंह आणि टीना थडानी हे स्पाॅट झाले असून यावेळी हनी सिंहच्या हातामध्ये टीनाचा हात दिसतोय. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते यावर कमेंट करताना दिसत आहेत.
एक युजर्सने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले आहे की, हनी सिंह याची नवीन GF दिसत आहे. यावर दुसऱ्या युजर्सने लिहिले की, नवीन काय? ही त्याची अगोदरपासूनचीच GF आहे.
काही चाहत्यांना हनी सिंह आणि टीना थडानी यांची जोडी आवडली आहे तर काही युजर्स यावर टीका देखील करत आहेत. हिच्यामुळेच तू शालिनीला सोडले का? असाही प्रश्न काही युजर्स विचारताना दिसत आहेत.