अक्षय कुमार याचा सेल्फी आपटला, शहजादाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पठाण चित्रपटाची जादू कायम

| Updated on: Feb 25, 2023 | 4:07 PM

ओपनिंग डेला तर चित्रपटाने जगरातून तब्बल 100 कोटींची कमाई केली. गेल्या आठवड्यामध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झालाय.

अक्षय कुमार याचा सेल्फी आपटला, शहजादाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पठाण चित्रपटाची जादू कायम
Follow us on

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे रिलीजला इतके दिवस होऊनही बाॅक्स आॅफिसवर अजूनही फक्त पठाण (Pathaan) चित्रपटाची हवा बघायला मिळत आहे. पठाण चित्रपटाने सुरूवातीपासूनच अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. ओपनिंग डेला तर चित्रपटाने जगरातून तब्बल 100 कोटींची कमाई केली. गेल्या आठवड्यामध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झालाय. अक्षय कुमार याचा सेल्फी चित्रपट देखील शुक्रवारी रिलीज झालाय.

पठाण चित्रपटाची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये असल्याचे बाॅक्स ऑफिस कलेक्शनवरून स्पष्ट होत आहे. अक्षय कुमार याच्यासाठी 2022 हे वर्ष फार काही खास गेले नाही. 2022 मध्ये अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेले. तर दुसरीकडे कार्तिक आर्यन याचा शहजादा देखील फ्लाॅप जाताना दिसत आहे.

2022 हे वर्ष कार्तिक आर्यन याच्यासाठी लकी ठरले. कारण या वर्षात कार्तिक आर्यन याच्या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धमाका करत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. कार्तिक आर्यन याचे एका मागून एक असे तब्बल तीन चित्रपट हिट ठरले. यामुळे शहजादाकडून मोठ्या अपेक्षा नक्कीच होत्या.

अक्षय कुमार याच्या सेल्फी चित्रपटाचा ओपनिंग डे अजिबातच खास ठरला नाही. कारण या चित्रपटाने ओपनिंग डेला 3 कोटींची कमाई बाॅक्स ऑफिसवर केली. अक्षय कुमार याची जादू कमी झाल्याचे दिसत आहे. कारण बाॅक्स ऑफिसवर अक्षय कुमार याचे चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

31 व्या दिवशी शुक्रवारी पठाण चित्रपटाने सर्व भाषांमध्ये एक कोटींचे कलेक्शन केले. भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे आतापर्यंत एकूण कलेक्शन 521.16 कोटी झाले. शहजादा चित्रपटाचे एकूण बाॅक्स ऑफिस कलेक्शन 27.75 कोटी रुपयांवर गेले आहे. अक्षय कुमार याच्या सेल्फी चित्रपटाला धमाका करण्यात अपयश मिळाले आहे.

पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादात अडकला होता. सतत या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी ही सोशल मीडियावर केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाची हवा बघायला मिळाली. आता पठाण चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल 31 दिवस झाले असून चित्रपटाची जादू बघायला मिळत आहे. शाहरुख खान याचा झिरो चित्रपट फ्लाॅप गेला होता.