मुंबई : कोरोना (Corona) महामारीमुळे अनेक चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकले नाहीत. मात्र, 2021मध्ये चित्रपटसृष्टीला थोडा दिलासा मिळाला आहे. अनेक चित्रपटगृहे उघडली आणि प्रेक्षकांची गर्दीही पाहायला मिळाली.
प्रेक्षकांना उत्सुकता
आता हे वर्ष सरत आलंय. या आठवड्यात काही मोठे चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होणार आहेत. यातील काही चित्रपट आणि वेब सीरिज बड्या स्टार्सच्या आहेत, तर काही उत्तम कथेमुळे चर्चेत आहेत. ’83’, ‘जर्सी’ (Jersey) आणि ‘अतरंगी रे'(Atrangi Re)ची वाट पाहत प्रेक्षक पाहताहेत.
बुर्ज खलिफावर ट्रेलर
नुकताच रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण(Deepika Padukone)चा ’83’ या चित्रपटाचा ट्रेलर दुबईतल्या जगातल्या सर्वात मोठी इमारत बुर्ज खलिफा(Burj Khalifa)वर चालवण्यात आला. हा ट्रेलर (Trailer) पाहण्यासाठी आणि आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हजारो लोक बुर्ज खलिफाजवळ जमले होते. प्रत्येकजण हा क्षण आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात व्यस्त होता. कबीर खाननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. हा चित्रपट या आठवड्याच्या २४ तारखेला रिलीज होणार आहे.
मोठी स्टारकास्ट
‘अतरंगी रे’ हादेखील मोठ्या स्टारकास्टचा चित्रपट आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार ते धनुष, निम्रत कौर आणि सारा अली खान दिसणार आहेत.
डोळ्यांत आणेल पाणी
त्याचबरोबर शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जर्सी’देखील या यादीत सामील झाला आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटात शाहिद कपूरचे वडील पंकज कपूरही प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची ही कथा आहे, जी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल.
वेब सीरिजही चर्चेत
चित्रपटांसोबतच अनेक वेब सीरिजही चर्चेत आहेत. त्यापैकी अभिषेक बच्चनचा ‘बॉब बिस्वास’ (हिंदी), ‘कोबाल्ट ब्लू’ (मराठी), ‘चितिराई सेवानम’ (तमिळ), ‘मंची रोजुलूचेई’ (तेलुगू) आणि ‘पुकसत्ते लिफू’ (कन्नड) आहेत. अभिषेक बच्चन सध्या चित्रपटांपेक्षा वेब सीरिजवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे.