मुंबई : संगीत हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. संगीत ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येकाचा मूड बदलते. विशेषतः बॉलिवूडची गाणी. हिंदी चित्रपटसृष्टीत तुम्हाला सर्व प्रकारची गाणी ऐकायला मिळतील. मग तो रोमान्स असो किंवा पार्टी. असे बरेच मोठे गायक आहेत, जे त्यांच्या संगीताने प्रत्येकाचे मन जिंकतात. कधीकधी बॉलिवूडमध्ये असे घडते की, जरी चित्रपट मोठ्या पडद्यावर जादू दाखवू शकला नसला, तरी लोकांना चित्रपटाचे संगीत खूप आवडते. पण, बॉलिवूडवर फक्त इतर चित्रपटांची कॉपी करण्याचाच आरोप नाही, तर अनेक वेळा गायकांवर संगीत चोरल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अलीकडेच अनु मलिकवर (Anu Malik) इस्रायलच्या राष्ट्रगीताची धून चोरल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनु मलिक सोशल मीडियावर खूप ट्रोल झाले. पण अनु मलिक एकमेव गायक आणि संगीतकार नाही ज्यांच्यावर कोणत्याही धून चोरल्याचा आरोप आहे. त्यांच्याशिवाय इतर अनेक गायक आणि संगीतकारांवरही संगीत चोरल्याचा आरोप लावण्यात आले आहेत. पाहूया या यादीत कोणाचा समावेश आहे
जेव्हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये इस्रायलने आपले दुसरे सुवर्णपदक जिंकले आणि त्याचे राष्ट्रगीत वाजवले, तेव्हा लोकांना समजले की, अनु मलिकने त्याच्या ‘दिलजले’ चित्रपटातील ‘मेरा मुल्क मेरा देश’ या गाण्यात इस्रायलच्या राष्ट्रगीताच्या सुरांची नक्कल केली आहे. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले. तशी, ही पहिली वेळ नाही, जेव्हा त्याच्यावर धून चोरल्याचा आरोप झाला आहे, यापूर्वी त्याच्यावर इंग्रजी गाणे मॅकेरेनासह अनेक गाण्यांच्या धून चोरल्याचा आरोप आहे.
बादशाहने काही काळापूर्वी त्याचे ‘गेंदा फूल’ हे गाणे रिलीज केले. या गाण्यात जॅकलिन फर्नांडिस होती. हे गाणे लोकांना चांगलेच आवडले, पण नंतर कळले, की हे मूळ गाणे ‘बोरोलोकी बिटिलों’ या बंगाली गाण्याची कॉपी आहे. रतन कहार यांनी हे गाणे लिहिले आहे. यामुळे सोशल मीडियावर बादशहाला खूप ट्रोल करण्यात आले. त्यानंतर बादशहाने रतन कहारला 5 लाख रुपये दिले.
प्रीतम हे एक असे गायक आणि संगीतकार आहेत ज्यांच्यावर एक किंवा दोन नव्हे तर अनेक वेळा संगीत चोरल्याचा आरोप झाला आहे. असे म्हटले जाते की प्रीतमने आतापर्यंत हिट केलेली सर्व गाणी कोणत्या ना कोणत्या गाण्याची कॉपी आहेत. प्रीतमने त्याच्या संगीतासाठी ‘अमेरिकन पाय’ आणि ‘थ्रिलर’सारख्या इंग्रजी धून चोरल्या. एवढेच नाही तर, ‘तू ही मेरी शब है सुबाह हे’ गाणे ऑलिव्हर शांती अँड फ्रेंड्सचे गाणे ‘सेक्रेल निर्वाना’ या गाण्यातून कॉपी केल्याचे म्हटले जाते.
सलीम-सुलेमान जोडी सुपरहिट आहे. दोघेही उत्तम संगीतकार आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सलीम मर्चंटवर संगीत चोरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहते खूप निराश झाले होते. 2017 मध्ये, जेव्हा सलीमचे ‘हारेया’ हे गाणे रिलीज झाले, तेव्हा पाकिस्तानी गायक आणि अभिनेता फरहान सईदने त्याच्यावर आरोप केला होता की, हे गाणे 2014मध्ये आलेल्या त्यांच्या ‘रयान’ या गाण्याची कॉपी आहे. सलीम मर्चंटने हा आरोप फेटाळून लावला असला, तरी दोन्ही गाण्यांची चाल सारखीच होती.
राकेश रोशनचा भाऊ राजेश रोशनचे नाव देखील गाण्यांच्या कॉपी करण्याच्या बाबतीत अनेक वेळा समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, राजेश यांनी संगीतबद्ध केलेले ‘लावारीस’चे लोकप्रिय गाणे ‘तुमने जो कहा’ हे इंग्रजी गाणे ‘बार्बी गर्ल’वरून तर, ‘जब को बात बिघड जाये’ हे इंग्रजी गाणे ‘फाइव हंड्रेड माइल्स’ याच्या थीममधून चोरले गेले आहे. याशिवाय त्यांच्यावर ‘हसीना गोरी-गोरी’, ‘लांऊ कहां से’ यासह अनेक गाण्यांच्या संगीताची कॉपी केल्याचा आरोप आहे.
…आणि अभिनेते मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले! प्रसंगावधानामुळे टळली ‘जयंती’च्या सेटवरची दुर्घटना
‘जोधा अकबर’ फेम अभिनेता मोठ्या आर्थिक अडचणीत, आजारपणामुळे कापावा लागला पाय