सलमान खान याच्यासोबत पदार्पण करूनही हे स्टार्स करिअरमध्ये फ्लाॅप, फक्त शहनाज गिल आणि पलक तिवारीच नाही तर

| Updated on: Apr 21, 2023 | 5:01 PM

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सलमान खान याच्या या चित्रपटातून शहनाज गिल आणि पलक तिवारी या बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

सलमान खान याच्यासोबत पदार्पण करूनही हे स्टार्स करिअरमध्ये फ्लाॅप, फक्त शहनाज गिल आणि पलक तिवारीच नाही तर
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा आज किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटातून शहनाज गिल आणि श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. अनेकांना वाटते की, सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले की, करिअर सेट होते. मात्र, असे अजिबात नाहीये. सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये डेब्यू करूनही अनेकांचे चित्रपट (Movie) फ्लाॅप गेले आणि त्यांना इतर चित्रपटांच्या आॅफर देखील मिळाल्या नाहीत.

सलमान खान याच्या या चित्रपटामध्ये पूजा हेगडे ही मुख्य भूमिकेत आहे. शहनाज गिल आणि पलक तिवारी या देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सतत रंगत होती, पलक तिवारी ही सलमान खान याच्यावर नाराज आहे. पलक तिवारी हिने काही दिवसांपूर्वी आर्यन खान याच्याबद्दल मोठे भाष्य केले होते.

जरीन खान

जरीन खान हिने सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सलमान खान याच्या 2010 मध्ये रिलीज झालेल्या वीर चित्रपटातून तिने बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला. विशेष म्हणजे हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिटही ठरला. यानंतर तिला बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर आल्या. मात्र, बाॅलिवूडमध्ये तिला कधीच यश मिळाले नाही.

भूमिका चावला

भूमिका चावला हिने सलमान खान याच्या तेरे नाव या चित्रपटामधून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे या चित्रपटाने तूफान अशी कामगिरी केली. मात्र, त्यानंतर भूमिका चावला हिचा एकही चित्रपट हिट ठरला नाही. आता भूमिका चावला ही एखादी छोटी भूमिका साकारताना दिसते.

नगमा

नगमा हिने सलमान खान याच्या बागी चित्रपटातून पदार्पण केले. मात्र, तिला पुढे चित्रपटाच्या आॅफर आल्या नाहीत. अत्यंत कमी चित्रपटांमध्ये नगमा प्रेक्षकांच्या भेटीला आली. हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळत नसल्याने नगमा हिने साऊथ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केली.

स्नेहा उल्लाल

स्नेहा उल्लाल हिने 2005 मध्ये रिलीज झालेल्या लकी या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर स्नेहा उल्लाल ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर गेली. या चित्रपटानंतर ती कोणत्याही चित्रपटामध्ये दिसली नाही. चित्रपट फ्लाॅप गेला आणि स्नेहा उल्लाल हिचे करिअरचा खराब झाले.