मुंबई : गुजराती ‘छेल्लो शो’ हा चित्रपट यंदा भारताकडून (India) ऑस्करसाठी पाठवण्यात आलाय. हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आता याच चित्रपटासंदर्भात एक अत्यंत दु:ख बातमी पुढे येतंय. छेल्लो चित्रपटात (Movie) बालकलाकाराची भूमिका साकारणारा अभिनेता राहुल कोळीचे निधन झालंय. राहुलच्या निधनाने अनेकांना मोठा धक्काच बसलाय. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राहुल कोळी (Rahul Koli) हा कर्करोगाशी झुंज देत होता. अखेरीस त्याची झुंज संपलीये आणि प्राणज्योत मावळली.
राहुल कोळीच्या वडिलांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून राहुलला सतत ताप येत होता. तसेच त्याला रक्ताच्या उलट्याही होत होत्या. राहुलचा एक खास चित्रपट तीन दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र, त्याअगोरदच राहुलची प्राणज्योत मावळली आहे. राहुलच्या अशा अचानक जाण्याने त्याचा चाहत्यांना मोठा धक्काच बसलाय. राहुल आपल्यामध्ये नाहीये हा विश्वास अनेकांना बसत नाहीये.
राहुलने अवघ्या 10 वर्षांमध्ये बालकलाकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. राहुलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. रविवारी सकाळी नाश्ता केल्यानंतर राहुलला ताप आला आणि यादरम्यान त्याने तीन रक्ताच्या उलट्या देखील केल्या. यानंतर राहुलची प्राणज्योत मावळली. राहुलच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलांय. राहुलचा चित्रपट 14 ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.