चित्रपटाच्या अपयशाचे खापर सलमान खान आणि आमिर खान यांच्यावरच, निर्माता म्हणाला, या दोघांमुळेच फ्लाॅप चित्रपट…

| Updated on: May 07, 2023 | 3:18 PM

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय .मात्र, सलमान खान याच्या या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद हा प्रेक्षकांच्या मिळताना दिसत नाहीये. आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

चित्रपटाच्या अपयशाचे खापर सलमान खान आणि आमिर खान यांच्यावरच, निर्माता म्हणाला, या दोघांमुळेच फ्लाॅप चित्रपट...
Follow us on

मुंबई : ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटामध्ये सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान हे धमाल करताना दिसले. विशेष म्हणजे यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मात्र, असे असताना देखील बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाका करण्यात अंदाज अपना अपना चित्रपटाला यश मिळाले नाही. अंदाज अपना अपना (Andaz Apna Apna) हा चित्रपट रिलीज होऊन आता तब्बल 29 वर्ष होत आहेत. 1994 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात आमिर खान आणि सलमान खान यांनीही जबरदस्त असा अभिनय केला. चित्रपट (Movie) धमाकेदार होता अभिनेत्यांनी देखील जबरदस्त भूमिका केली. मात्र, असे असताना देखील हा चित्रपट फ्लाॅप गेला.

अखेर तब्बल 29 वर्षांनंतर चित्रपटाच्या निर्मात्यानी चित्रपट प्लाॅप जाण्याचे कारण सांगत काही गंभीर आरोप केले आहेत. चित्रपट अखेर फ्लाॅप का गेला आणि नेमकी चूक कुठे झाली हे निर्मात्याने सांगितले आहे. अंदाज अपना अपना या चित्रपटाचे नाव जरी काढले तरीही लोकांच्या मनातील जुन्या आठवणी या ताज्या होताना दिसतात.

अंदाज अपना अपना चित्रपटाचे निर्माता राजकुमार संतोषी यांनी नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये राजकुमार संतोषी यांनी अत्यंत मोठा खुलासा केलाय. राजकुमार संतोषी म्हणाले की, अंदाज अपना अपना या चित्रपटाची खूप जास्त वेगळी स्टोरी होती. चित्रपटात रोमान्स, कॉमेडीचा जबरदस्त असा तडका होता.

राजकुमार संतोषी यांनी म्हटले की, मुळात म्हणजे चित्रपटाच्या दोन्ही मुख्य कलाकारांनी अजिबात चित्रपटाचे प्रमोशन केले नाही. आमिर खान असो किंवा सलमान खान हे दोघेही चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कोणत्याच शहरात गेले नाहीत. निर्देशक देखील इतर ठिकाणी शूटिंग करण्यात बिझी होते. यामुळे चित्रपटाचे काहीच प्रमोशन केले गेले नाही.

इतकेच नाही तर चित्रपटाबद्दल काहीच चर्चा नव्हती. म्हणजेच चित्रपटाच्या प्रमोनशसाठी जे काही करायला हवे होते, ते काहीच केले गेले नाही. यामुळे वितरकही खूप नाराज झाले होते. चित्रपट फ्लाॅप होण्याचे कारण हेच आहे. लोकांना देखील चित्रपटाची स्टोरी समजून घेण्यात फार जास्त काळ लागला आणि चित्रपट फ्लाॅप गेला.

पुढे राजकुमार संतोषी म्हणाले, अंदाज अपना अपना चित्रपटाचे रिमेक करणे फार अवघड आहे. जो कोणी अंदाज अपना अपना चित्रपटाचे रिमेक करेल तो नक्कीच डुबेल. कारण या चित्रपटात रिमेक करण्याची अजिबातच संधी नाहीये. चित्रपट आजही एकदम फ्रेश दिसतो. एखाद्याने या चित्रपटाचे रिमेक करण्याचा विचार जरी केला तरी भविष्यात त्याचे खूप जास्त नुकसान होईल.