मुंबई : गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्स अँगलचा तपास करताना, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींच्या घरांवर छापा टाकला होता आणि अनेकांना ताब्यात घेतले. यामध्ये कॉमेडियन-अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचे पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांची नावे देखील समोर आली होती. त्यावेळी भारती आणि हर्ष यांना जामीन मंजूर करण्यात आला होता, पण एनसीबी त्यावर नाखूश आहे. नुकत्याच झालेल्या एका प्रकरणादरम्यान, NCB ने मुंबईतील सत्र न्यायालयात आपली नाराजी नमूद केली आहे.
एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, NCB भारती आणि हर्षला ड्रग्ज प्रकरणात जामीन देण्याच्या निर्णयावर खूश नाहीय. गुरुवारी सत्र न्यायालयात एनसीबीने दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाच्या आदेशावर बोलताना सांगितले की, भारती सिंह आणि हर्ष यांना ड्रग्स प्रकरणात जामीन मिळणे हे समाजासाठी धोकादायक संकेत आहे. हे दर्शवते की हायप्रोफाईल आरोपी सहज पळून जातात.
एनसीबीने म्हटले आहे की. न्यायालयाने समाजाला धोकादायक संकेत दिले आहेत की, ‘खटल्याची सुनावणी न करता डिवाइन एस्टेब्लिशमेंट प्रिंसिपल्सच्या आधारे उच्च प्रोफाइल गुन्हेगारांना सहज सोडता येते.’ खरं तर, एनसीबीने कोर्टात हे सांगितले की, जेव्हा ते ड्रग्स प्रकरणात दुसर्या आरोपीसंदर्भात कोर्टात सुनावणीसाठी पोहोचले होते.
गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर रोजी NCB ने भारती आणि हर्षच्या अंधेरी येथील घरावर छापा टाकला होता. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातून 86.50 ग्रॅम गांजा जप्त केला होता. भारती आणि हर्ष यांनी कबूल केले होते की ते दोघे गांजा घेतात. यानंतर एनसीबीने भारती आणि हर्षला अटक केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी भारती आणि हर्ष यांना जामीन मंजूर झाला.
हर्ष आणि भारती यांना NCB ने आधीच समन्स बजावले होते. नंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतले. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली होती. तर, तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयालाही अटक करण्यात आली होती.
दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता कारण कोर्टात एनसीबीने हर्ष आणि भारती सिंग यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा दाखल केला नव्हता. प्रत्येकी 15 हजार रुपये जमा केल्यानंतर भारती आणि हर्ष यांची जामिनावर सुटका झाली. जामिनावर बाहेर आल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष यांचे आयुष्य पुन्हा रुळावर आले आणि ते पूर्वीप्रमाणे आपापल्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले.
Mouni Roy : मौनी रॉयने ब्लॅक ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अवतार, अॅमस्टरडॅममध्ये करतेय धमाल