मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. 21 एप्रिल रोजी सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय. सलमान खान याच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. चित्रपटाची म्हणावी तशी ओपनिंग झाली नाही. मात्र, वीकेंडला चित्रपट धमाका करताना दिसला आहे. सलमान खान याच्या या चित्रपटातून बिग बाॅस (Bigg Boss) फेम शहनाज गिल आणि श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी यांनी बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिच्या अभिनयाचे काैतुक हे केले जात आहे. शहनाजकडे अजून एका मोठ्या चित्रपटाची आॅफर देखील आहे.
सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा एक जुना फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान याच्या या फोटोमध्ये त्याच्या कडेवर एक लहान मुलगा देखील दिसत आहे. फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की, सलमान खान याच्यासोबत दिसणारा हा लहान मुलगा नक्की कोण? सलमान खान या मुलासोबत धमाल करताना दिसतोय.
सलमान खान याच्यासोबत जो लहान मुलगा दिसत आहे. तो सलमान खान याच्याच अभिनेत्रीला आता डेट करतोय. सलमान खान याच्या फोटोमध्ये दिसणारा हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून जहीर इकबाल हा आहे. जहीर इकबाल हा सध्या बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला डेट करत आहे. मात्र, दोघांनीही आपल्या रिलेशनवर काही भाष्य केले नाहीये.
Being Launched Tomorrow … KAL dekhte hai yeh ladka AAJ kaise dikhta hai … pic.twitter.com/2VpmWvD9J8
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 30, 2018
जहीर इकबाल याने 2019 मध्ये नोटबुक या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे तो चित्रपट सलमान खान यानेच प्रोड्यूस केलेला आहे. जहीर इकबाल याच्या अभिनयाचे काैतुकही केले गेले होते. अनेकदा जहीर इकबाल आणि सोनाक्षी सिन्हा हे स्पाॅट होतात. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी यांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरू होत्या.
सोनाक्षी सिन्हा हिच्या काही दिवसांपूर्वी डबल एक्सएल हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर फार काही धमाल करण्यात यश मिळाले नाही. हा चित्रपट फ्लाॅप गेला. सोनाक्षी सिन्हा हिचा डबल एक्सएल हा चित्रपट 14 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये जास्त वजन असलेल्या मुलींची स्टोरी दाखवण्यात आलीये.