मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी ही त्याच्यावर सतत गंभीर आरोप करताना दिसली. काही दिवसांपूर्वी आलिया सिद्दीकी हिने सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आलिया सिद्दीकी ही तिच्या दोन मुलांसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या घराबाहेर दिसत होती. मध्यरात्री तिला आणि तिच्या मुलांना घराबाहेर काढण्यात आल्याचा आरोप हा आलिया सिद्दीकी हिने केला होता. इतकेच नाहीतर नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या विरोधात आलियाने अनेक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर केले.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी यांच्यामधील वाद इतका जास्त वाढला की, थेट हा वाद कोर्टात जाऊन पोहचलाय. आलिया सिद्दीकी सतत आरोप करण्यात असल्याने काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपण शांत का बसत आहोत याचा खुलासा केला.
इतकेच नाहीतर नवाजुद्दीन सिद्दीकी यानेही आलिया सिद्दीकी हिच्यावर आरोप केले.
नवाजुद्दीन सिद्दीकी याने काही दिवसांपूर्वीच पत्नी आलिया उर्फ जैनब सिद्दीकी आणि भाऊ शमशुद्दीन यांच्या विरोधात 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केलाय. मात्र, काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी याने एक पाऊल मागे घेतले. या सर्व वादामध्ये मुलांचे नुकसान होत असल्याचे नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले.
या वादामुळे मुलांना शाळेत जाता येत नाहीये, त्यांचे नुकसान होत असल्याने नवाजुद्दीन सिद्दीकी याने पत्नीसोबत तडजोड करण्याचा निर्णय घेतलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याची पत्नी आलिया सिद्दीकी आणि भाऊ शमशुद्दीन सिद्दीकी यांना 3 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
इतकेच नाहीतर या सुनावणी वेळी मुंबई उच्च न्यायालयात 3 एप्रिल रोजी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाची 12 वर्षांची मुलगी, आणि 7 वर्षांचा मुलगा यांना देखील कोर्टात यावे लागणार आहे. असे थेट आदेशचे उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावेळी हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अभिनेत्याच्या याचिकेवर न्यायालयाने आज हे आदेश दिले आहेत. मात्र, ही 3 एप्रिलची सुनावणी बंद रूममध्ये केली जाणार आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, त्यांना मुलांची काळजी आहे आणि त्यांची इच्छा आहे की शांततापूर्ण तोडगा निघावा. आता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या 3 एप्रिलच्या सुनावणीकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत.