मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. या चित्रपटाने तूफान अशी कामगिरी बाॅक्स आॅफिसवर केलीये. पठाण चित्रपटानंतर सर्वांनीच शाहरुख खान याचे काैतुक केले. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट (Movie) ठरलाय. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या पठाण (Pathaan) चित्रपटाने बाहुबली या चित्रपटाचा रेकाॅर्ड देखील मोडलाय. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. चाहत्यांमध्ये कमालीची क्रेझ पठाण चित्रपटाबद्दल बघायला मिळत होती.
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. अनेकांनी या चित्रपटाला विरोध केला होता. इतकेच नाहीतर देशातील अनेक ठिकाणी चित्रपटाच्या विरोधात आंदोलनेही करण्यात आली. चित्रपटातील बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यावर हा वादाचा चित्रपटाला फायदा झाल्याचे दिसून आले.
अनेकांनी थेट पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले होते. मात्र, या वादावर शाहरुख खान किंवा चित्रपटाशी संबंधित कोणीही काही भाष्य केले नाही. सतत चित्रपटाला विरोध होत होता. काही संघटना चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावरही उतरल्या होत्या.
पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. शाहरुख खान चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन करत होता. नुकताच एक पाकिस्तानी अभिनेत्याने शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची खिल्ली उडवलीये. पाकिस्तानी अभिनेत्याने थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला टार्गेट केले आहे.
पाकिस्तानी अभिनेता यासिर हुनैस याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, जर तुम्ही मिशन इम्पॉसिबल पाहिला असेल, तर शाहरुख खान याचा पठाण हा स्टोरीलेस व्हिडिओ गेमपेक्षा अधिक काही नाही वाटणार…आता यासिर हुनैस याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी आता यासिर हुनैस याला टार्गेट करण्यासही सुरूवात केलीये. पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर 1000 कोटींपेक्षा अधिक कलेक्शन केले आहे आणि या चित्रपटाला विदेशातूनही प्रेम मिळाले आहे.